पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोपरी पूलाचे गुरुवारी लोकार्पण झाले. पूल पूर्णक्षमतेने सुरू झाल्याने त्याचा शुक्रवारी परिणाम जाणवला. कोंडी नसल्याने पहिल्याच दिवशी ठाणेकरांच्या ३० ते ४० मिनीटांच्या वेळेची बचत झाली आहे. त्यामुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले.
हेही वाचा >>> ठाण्यात पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाची मालिका; मनसे तसेच भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
मुंबई ठाण्यातील वाहतूकीसाठी कोपरी पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून हजारो वाहन चालक ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. पंरतु अरुंद पूलामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतो. मागील चार वर्षांपासून या पूलाचे काम सुरू होते. पूल अरुंद असल्याने ठाणेकरांना दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत होता. महामार्ग असूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत पोहचता येत नसल्याने कार्यालयीन कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून या पूलाच्या रुंदीकरणाचे काम चार वर्षांपासून सुरू होते. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या पूलाचे लोकार्पण झाल्याने हा पूल आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला होता. पहिल्याच दिवशी त्याचा चांगला परिमाम जाणवला. दररोज मुंबईच्या दिशेने सकाळी होणारी वाहतूक कोंडी शुक्रवारी सुटल्याचे चित्र होते. त्यामुळे वाहन चालकांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले.
हेही वाचा >>> वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा येथे थांबा देण्याची मागणी
मुंबईच्या दिशेने वाहतूक करताना दररोज वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत होता. कोपरी पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे. आता कार्यालयात आणि घरी वेळेत पोहचता येईल. – रोशना बेंद्रे, वाहन चालक, ठाणे.
अरूंद कोपरी पूलामुळे ठाणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत होता. परंतु पूल सुरू झाल्याने शुक्रवारी वाहतूक कोंडी झाली नाही. – ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस निरीक्षक, कोपरी वाहतूक शाखा.