सांगली: शाळेसाठी पुण्याहून आणलेल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला आजन्म सश्रम कारावास आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सह सत्र न्यायालयाने मंगळवारी सुनावली.

संपत सीताराम फाळके (वय ५५ रा. जुळेवाडी ता. तासगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने करोना काळात शिक्षण बंद झाल्याने पिडीतेला आपल्या घरी आणले. यावेळी तिच्यावर अतिप्रसंग केला. यामध्ये ती गरोदर राहिली. ही बाब कोणालाही सांगू नकोस अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकीही दिली होती.

Sangli married woman Abuse , Sangli Abuse,
सांगली : विवाहितेवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Amravati, amravati minor girl abuse, am minor girl, abuse, Kurha Police, Prevention of Rape Act, sexual violence, local citizens, arrest
अमरावती : खळबळजनक! १५ वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार
Pimpri teacher, teacher POCSO, teacher molested girl,
पिंपरी : पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या शिक्षकाकडून पुन्हा शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे
shiye kolhapur news, Shiye village bandh,
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी; शिये गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे का ? बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा संताप
Kalyaninagar accident case
कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला
Thane, BJP office, plaque, Badlapur sexual abuse, Badlapur, school director, protest, Maha vikas Aghadi,
तुम्हाला लाज वाटत नाही का, लाज… ठाण्यातील भाजप कार्यालयासमोर झळकले फलक

हेही वाचा… …आणि डॉक्टर देवेंद्र फडणवीस, जपानमधील विद्यापीठाकडून बहुमान

दरम्यानच्या काळात तिला पलूस येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखविण्यात गेले असता ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी मुलीच्या जन्माचा दाखला मागणी करताच आरोपीने पळ काढला. मात्र, डॉक्टरांनी याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्यावेळी पोलीसांनी चौकशी केली असता पिडीतीने आरोपीच्या धमकीमुळे बिहारी तरूणाने अतिप्रसंग केल्याचा खोटा जबाब दिला. याचा तपास करीत असताना मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती पोलीसांना मिळाली.

हेही वाचा… “अरे आधी उतरू दे ना, एवढी घाई का करतोय”, चांद्रयानबाबतच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल विधान

संशयिताविरूध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी संशयिताविरूध्दचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे सांगत आज आरोपीला मरेपर्यंत सश्रम कारावास आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्यावतीने आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.