Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्यात संताप व्यक्त केला जातोय. तर, दुसरीकडे या मृत्यूकांडात ज्यांनी आपले जीवलग गमावले आहेत, त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला आहे. १२ वर्षांनंतर ज्या मातेची कूस उजवली, त्या माऊलीच्या तीन महिन्याच्या बालकाचाही यात मृत्यू झाल्याने तिने तिचा आक्रोश खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर बोलून दाखवला. तसंच, आज माध्यमांना प्रतिक्रिया देत रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळालेल्या वागणुकीचाही पाढा तिने वाचून दाखवला.

अनुसया काळे असे या महिलेचं नाव असून त्यांना १२ वर्षांनी बाळ झालं होतं. त्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथे राहणाऱ्या आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ गमावलं असल्याची प्रतिक्रिया मातेने दिली. त्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “डॉक्टरांनी माझ्या बाळाला पाहिलंच नाही. ते बाळाला औषधंच देत नव्हते. रात्रीही डॉक्टरांना विनंती केली. पण आम्ही व्हिडीओ बनवतो असं ते बोलू लागले.”

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
Child dies in husband-wife fight Crime of culpable homicide against man
पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…
death of a boy, Pimpri, case registered doctors,
पिंपरी : चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरसह दोन परिचारिकांवर गुन्हा

हेही वाचा >> “भाजपाने पळपुटेपणा करण्यापेक्षा उघडपणे…”, सुप्रिया सुळेंचं मोदी सरकारला थेट आव्हान

“बाळाला न्युमोनिया झाला होता आणि हृदयाला छिद्र होते. तीन- साडेतीन महिन्याचं ते बाळ होतं. छातीकडे आम्ही दोघं-तिघं दाबू लागलो. माझ्या बाळाचे पाय गार पडले तरी डॉक्टर बघायला नाही आले. आम्हाला म्हणाले एकच रुग्ण आहे का बघायला. डोळेही कडक झाले तरी बघत नव्हते”, अशी करुण कहानी महिलेने माध्यमांना सांगितली.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज या रुग्णालयात दौरा केला. यावेळी या पीडित महिलेचीही भेट त्यांनी घेतली. या महिलेने खासदार सुप्रिया सुळे यांनाही सविस्तर कहाणी सांगितली.

दरम्यान, नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णलयात २४ तासांत २४ मृत्यू झाल्याची माहिती ३ ऑक्टोबर रोजी उजेडात आली. त्यानंतरही येथील मृतांचा आकडा वाढत गेला. या मृतांमध्ये नवजात बालकांचाही समावेश आहे. औषधांचा अपुरा पुरवठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे हे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे डीन श्यामकुमार वाकोडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, शिशू विभागातील डॉक्टरांवरही कारवाई झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.