सांगली : चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना एका तरुणाला अटक करुन ६ लाख ७३ हजाराचा ऐवज जप्त करण्यात पोलीसांना यश आले असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सोमवारी सांगितले. संशयिताने दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.अधिक्षक बसवराज तेली यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर बर्धन व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन कोम्बींग ऑपरेशन राबवुन घरफोडीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पथकामधील राजु शिरोळकर यांना यल्लाप्पा ऊर्फ खल्या आदरक शिंदे (वय ४२ रा. दत्तनगर, मोहोळ, जि. सोलापुर) हा चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने विक्री करीता मिरज येथील सिव्हील हॉस्पिटल चौकात बसवेश्वर उदयानासमोर येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. उद्यान परिसरात सापळा लावून थांबले असता, एक इसम हिरव्या रंगाची पिशवी हातात घेवून श्री. बसवेश्वर उद्यानासमोर येवून थांबला तसा त्याचा संशय आलेने पथकाने सदर ताब्यात घेवून चौकशी करीत झडती घेतली. त्याच्या हातातील पिशवीत १० तोळे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचे दागिने मिळून आले.

मिरज तालुक्यातील सुभाषनगर, मालगाव आणि एरंडोली गावात, कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड आणि जत तालुक्यात डफळापुर, कंठी, वायफळ, आणि बनाळी गावात रात्री आणि दिवसा घर फोडी करून चोरी केली असल्याची कबूली त्यांने दिली. संशयित आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सोलापूर जिल्हयात तसेच कर्नाटक राज्यात विवीध पोलीस ठाणेस घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The burglar was arrested and jewelery worth 6 lakh 73 thousand was seized sangli amy