पालघर शहरात स्टेट बँकेसमोर जगदंबा हॉटेल परिसरात वाहतुकीच्या वर्दळीच्या वेळी एका कारने अचानक पेट घेतल्याने नागरिकांना द बर्निंग कारच्या थराराचा अनुभव आला. यावेळी एकच गोंधळ उडाला व काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महावितरणचे सहायक अभियंता रमेश देवबा कोळी (रा.पालघर) यांची ही कार असल्याचे समोर आले आहे. पालघर शहराकडे जात असताना जगदंबा हॉटेलच्या वळणावर कारच्या इंजिनने अचानक पेट घेतला व आगीचा मोठा भडका उडाला. भर रस्त्यावर गर्दीच्यावेळी कारने पेट घेतल्याने माहीम व टेम्भोडे रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. नागरिकांनी, पोलिसांनी, गृह रक्षक दलाच्या जवानांनी आग विझवून ही कार बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आणखी वाचा