वाई: खाजगी ट्रॅव्हल्समधील २२ लाख रुपयांची बॅग चोरीचा गुन्हा मध्यप्रदेश येथील आरोपीस अटक करुन भुईंज पोलिसांनी उघडकीस आणला. चोरीस गेलेली १८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बस बोपेगाव (ता वाई) येथील हॉटेलवर थांबलेली असताना प्रवासी नरेंद्र प्रल्हादसिंग गिरासे (विश्रांतवाडी, पुणे) यांची सीटवर ठेवलेली २२ लाख रुपयांची बॅग अज्ञाताने लांबवली होती. याबाबत भुईंज (ता वाई) पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड

चोरीस गेलेली रक्कम जास्त असल्याने व आरोपी अज्ञात असल्याने त्याला निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. महामार्गावरील व संशयित पळून जाण्याचा मार्गावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अनेक आधुनिक बाबी व्दारा त्यांनी आरोपी निष्पन्न केले. रज्जाब हसन खान (वय ४२,सिंधी मोहल्ला,धरमपुरी,जि धार,मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.

हेही वाचा… “उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार? या विचारांतून एकनाथ मामांनी…”, अयोध्या पौळ यांची बोचरी टीका

वाई न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.त्याच्याकडून अठरा लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,वाईचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब बालचिम यांनी टीमचे अभिनंदन केले.

Story img Loader