लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: ऐतिहासिक पन्हाळा गडावरील तानपीर बाबांचा दर्गा मजारीची मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून नासधूस केली होती. या घटनेनंतर तणावाचे वातावरण बनले. प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक हिंदू-मुस्लिमांनी एकजूट दाखवत मजारीची पूर्ववत उभारणी केली.

हजरत शहादुद्दिन खतालशावली यांचे पन्हाळा गडावर आगमन झाले तेव्हा त्यांनी वास्तव्य केलेल्या ठिकाणी त्यांची मजार (दर्गा) उभारण्यात आली. हा दर्गा सर्वधर्मिय नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. पुसाटी बुरुज येथील या मजारबाबत आठ दिवसांपासून समाज माध्यमात चुकीचे संदेश पाठवले जात होते. धार्मिक स्थळांना बदनाम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली होती.

हेही वाचा… लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी स्वबळावर लढणार – शेट्टी

तणावपूर्ण शांतता

दरम्यान, गुरुवारी पहाटे अज्ञात व्यक्तींकडून मजारीची नासधूस केल्याचा प्रकार घडला. त्यावर हिंदू-मुस्लिम बांधवांच्यातुन संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिल्या. या घटनेने दर्गा परिसरात जमावबंदी लागू केली. पर्यटकांनी गजबजलेल्या पन्हाळ्यात शांतता पसरली होती. पर्यटनस्थळे निर्मनुष्य झाली होती. कडक बंदोबस्तात येथील मजारिची डागडुगी करून पूर्ववत उभारणी केली. पन्हाळावासीयांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन समाजात तेढ पसरवणाऱ्या कृत्याचा निषेध व्यक्त करून बंद पाळला. पुजारी इमाम आली गारदी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पथके रवाना झाली आहेत.