महाराष्ट्रातल्या राजकारणात २३ नोव्हेंबर २०१९ ही सकाळ कुणीही विसरणार नाही. बरोबर याच दिवशी पार पडला होता तो पहाटेचा शपथविधी. भाजपा आणि शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटण्यावरुन झालेला वाद विकोपाला जाऊन शिवसेनेने भाजपाऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरु होत्या. त्याच्या बातम्या येत होत्याच. अशात २२ नोव्हेंबर २०१९ च्या संध्याकाळी अजित पवार हे शरद पवार उपस्थित असलेल्या बैठकीतून तडकाफडकी निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिसलं ते पहाटेच्या शपथविधीचं दृश्य. त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगत सिंग कोश्यारींच्या उपस्थितीत कुणाला कसलीच कुणकुण लागू न देता अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेला चार वर्षे उलटली आहेत. मात्र आजही हा दिवस आला की पहाटेच्या शपथविधीची आठवण होतेच. हा शपथविधी कसा घडला? त्याचे सगळेच पैलू एव्हाना समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

८० तासांच्या आत सरकार गडगडलं

पहाटेचा शपथविधी झाला तरीही ते सरकार ८० तासांहून जास्त काळ टिकलं नाही. मात्र राजकारणात काही काही घटना अशा असतात ज्या काळाच्या पाटीवर आपलं अस्तित्व कायमचं अधोरेखित करुन जातात. पहाटेचा शपथविधी ही अशीच घटना ठरली. शरद पवारांनी अजित पवारांसह गेलेल्या सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजित पवार हे त्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्राने पाहिला. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विळ्या भोपाळ्यासारखं सख्ख्य असलेले पक्ष एकत्र येतील असं कुणालाही खरंतर वाटलं नव्हतं. मात्र तो प्रयोगही घडला. मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग जितका जोरदार आणि धक्कादायक होता त्यापेक्षाही धक्कादायक ठरलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतर २०२३ मध्ये अजित पवारांनी पुन्हा महायुतीसह सत्तेत येणं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास कधीही विसरणार नाही. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर या सगळ्या घटनेबद्दल अजित पवार यांनी सूचक मौन बाळगलं होतं. त्यांना कधीही प्रश्न विचारला तर ते नो कमेंट्स म्हणत. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या वेगाने सरकार पडलं त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांचं बंड मोडून काढलं अशाही राजकीय चर्चा झाल्या आणि रंगवल्या गेल्या. मात्र पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं हे उघड झालं. देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पद सांभाळावं लागलं. ज्यावेळी त्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. सुरुवातीच्या काळात (महाविकास आघाडी सत्तेत असताना) शरद पवार यांनीही या सगळ्या घटनेबाबत फारसं काही बोलणं पसंत केलं नाही. जे घडलं ते सोडून द्या असं ते म्हणायचे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत एक भाष्य केलं आणि पहाटेच्या शपथविधीची अपुरी वाटणाऱ्या घटनांची श्रृंखला पूर्ण झाली.

महाराष्ट्र हा पहाटेचा शपथविधी कधीच विसरणार नाही. (फोटो सौजन्य-अमित जोशी)

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

साधारण वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांनी बंड वगैरे केलं नव्हतं. ज्या काही गोष्टी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी झाल्या त्या सगळ्या शरद पवारांसह ठरल्या होत्या. त्यांना या सगळ्याची पूर्ण कल्पना होती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांनी विश्वासघात केला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. “उद्धव ठाकरे हे आमच्यासह निवडणूक लढले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की आपण काँग्रेस राष्ट्रवादीसह गेलो तर मुख्यमंत्री होऊ शकतो तेव्हा ते त्यांच्यासह गेले. त्यामुळे सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी आमच्याशी (भाजपा) केला.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

शरद पवारांबाबत काय म्हणाले फडणवीस?

“आमचा दुसरा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना मी कमी दोष देईन. कमी यासाठी देईन कारण ते काही आमच्याबरोबर निवडून आले नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासह उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत आणि त्यांची चर्चा पुढे गेली हे लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडेही राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आपण स्थिर सरकार देऊ. आपण सरकार तयार करु. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो तेव्हा तुम्हाला चेहरा पाहात बसता येत नाही. त्यामुळे आम्हीही चर्चा केली. आमची जी काही चर्चा झाली ती शरद पवार यांच्याशीच झालेली चर्चा होती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या कशा बदलल्या हे सगळ्यांनाच माहीत आहे. ” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. याबाबत शरद पवार यांना जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया बोलकी होती.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस २०१९ च्या शपथविधीनंतर (फोटो सौजन्य-अमित जोशी)

२२ फेब्रुवारी २०२३ ला शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटाबाबत विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, “महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली. ” यावर तुम्हाला पहाटेचा शपथविधी ठाऊक होता का? हे विचारल्यावर ‘मला जे बोलायचं ते बोललो समझनेवाले को इशारा काफी है’ असं सूचक विधान त्यांनी केलं.

प्रतिक्रिया आणि उलगडलेली कोडी

शरद पवार असं बोलल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांना याबाबत विचारलं गेलं. तेव्हा राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लावली गेली होती? याचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं असं म्हणत पुन्हा एकदा शरद पवारांकडेच अंगुलीनिर्देश केला. त्याबाबत पुन्हा एकदा शरद पवारांना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले की आमच्या नात्यात सदू शिंदे होते. ते उत्कृष्ट गुगली बॉलर होते. त्यांनी देशातल्या मोठमोठ्या खेळाडूंच्या विकेट घेतल्या होत्या. मी देखील क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मी क्रिकेट खेळलो नसलो तरीही मला गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा हे चांगलं माहीत आहे. समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली अशी बोलकी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

शरद पवारांनी उडवली देवेंद्र फडणवीसांची खिल्ली

२०१४ साली आम्ही उघडपणे भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१९ मध्येही आमच्यात तसं काही ठरलं असतं तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मला भेटले होते, ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झाली. पण फडणवीस स्वत: म्हणतात त्याप्रमाणे मी यासंबंधी धोरण बदलले. मग मी धोरण बदलले असताना देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? मी नकार दिल्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी चोरून शपथ का घेतली? देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची खात्री होती तर मग त्यांनी चोरून शपथ का घेतली? फडणवीस यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असता तर सरकार दोन दिवसांत कोसळले असते का? राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्यानेच देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. पण फडणवीस यांच्या या कृतीचा स्वच्छ अर्थ होता की, सत्तेसाठी आम्ही कुठे जाऊ शकतो. त्यांची ही पावलं समाजासमोर यावीत, यादृष्टीने काही गोष्टी करण्यात आल्या होत्या, असे शरद पवार यांनी सांगितले. मी फसवलं असे फडणवीस म्हणतात, पण ते स्वत: का फसले? या सगळ्यात मोदींचा काहीही संबंध नव्हता. देवेंद्र फडणवीस यांना सत्तेशिवाय करमत नव्हते, ते सत्तेशिवाय जगू शकत नव्हते. त्यांची ही अस्वस्थता महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे होते, असे शरद पवार म्हणाले. जे शरद पवार कालपर्यंत हे सांगत होते की मला पहाटेचा शपथविधी पाहून धक्का बसला त्यांनी या सगळ्या गोष्टी मान्य केल्या. म्हणजेच त्यांना याची कल्पना नव्हती असं म्हणता येणार नाही. शरद पवारांच्या ‘गुगली’च्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं.

पवारांच्या गुगलीच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांनी गुगली टाकला पण त्यामुळे मी बोल्ड व्हायच्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले. त्यांनी स्वतःच्या पुतण्यालाच बोल्ड केलं. पण काहीच हरकत नाही सत्य लवकरच बाहेर येईल” देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य आहे ३० जून २०२३ या दिवशीचं. त्यानंतर दोन दिवसात काय झालं हेदेखील महाराष्ट्राला ठाऊक आहेच. अजित पवार यांनी आपल्या बरोबच्या आमदारांसह सत्तेत येत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना काय सुचवायचं होते तेदेखील समोर आलं.

२ जुलै २०२३ या दिवशी काय घडलं?

अजित पवार यांनी देवगिरी या त्यांच्या सरकारी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते होते. या बैठकीनंतर शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार परिषद संपेपर्यंत अजित पवारांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांसह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम आणि संजय बनसोडे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांच्या भूमिके पाठिंबा नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं. जेव्हा इतकी मोठी घडामोड झाली तेव्हा पहाटेच्या शपथविधीबाबत मौन बाळगलेले अजित पवार थेटच बोलले.

५ जुलै २०२३ च्या भाषणात काय म्हणाले अजित पवार?

“२०१९ चे निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहीत होतं. एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले मोठे नेते (शरद पवार) आणि प्रफुल्ल पटेल तसंच भाजपाचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस होतो. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांनी (शरद पवार) सांगितलं कुठेच काहीही बोलायचं नाही. आता नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठे बोलेन? मी शांत राहिलो. त्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहीत आहे. मला आत्तापर्यंत २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीबाबत मीडियाने अनेकदा विचारलं की त्यावेळी काय झालं? परंतू मला कुणाला बदनाम करायचं नाही. त्यावेळी अचानक बदल झाला आणि शिवसेनेबरोबर जायचं असं सांगण्यात आलं. २०१७ ला शिवसेना शरद पवारांना जातीयवादी वाटली होती. २०१९ पर्यंत असा काय चमत्कार झाला? की भाजपा जातीयवादी झाला आणि शिवसेना मित्र झाला? असं चालत नाही. एकदा एक भूमिका मग वेगळी भूमिका असं चालत नाही.” असं म्हणत अजित पवार यांनी ५ जुलैच्या सभेत पहिल्यांदा पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. यानंतर याबाबत भूमिका मांडली ती छगन भुजबळांनी.

१२ ऑक्टोबर २०२३ ला छगन भुजबळ काय म्हणाले?

“२०१९ च्या पहाटेच्या शपथवविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं की शरद पवारांनी विश्वासघात केला ते योग्यच आहे. मी शरद पवार यांना गुरु मानतो त्यामुळे मी असं म्हणणार नाही. पण त्यांनी भाजपाला २०१९ मध्ये डिच केलं. शरद पवारांनी शब्द दिला होता म्हणून शिवसेनेची साथ सोडली. शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी झाली होती. मात्र नंतर जाऊन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगितलं होतं की मला भाजपाबरोबर जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की विश्वासघात केला. ते तसं म्हणू शकतात. मी हे म्हणतोय की शरद पवारांनी भाजपाला डिच केलं.”

अजित पवारांनी जे केलं त्याला बंड म्हणताच येणार नाही

अजित पवारांनी २०१९ मध्ये पहाटेचा जो शपथविधी केला ते काही बंड नव्हतं. त्यांनी भाजपाला दिलेला शब्द पाळला. शरद पवारांनी तो शब्द फिरवला. आम्ही त्यांच्या बरोबर गेलेले जे आमदार होते त्यांनाही परत आणलं. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची संमती नव्हती. पण त्या दरम्यान घडलं असं की शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु झाल्या. त्यावेळी नेहरु सेंटरमध्ये शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थोडे वाद झाले. शरद पवार त्यावेळी रागाने बाहेर पडले. ती संधी साधून अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी संपर्क केला. रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवली गेली. शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपाला जो शब्द दिला होता तो शब्द अजित पवारांनी पाळला, शरद पवार फिरले. त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला त्यामुळे २०१९ ला जो पहाटेचा शपथविधी झाला त्याला बंड म्हणताच येणार नाही. असं छगन भुजबळ म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं.

अजित पवार, शरद पवार यांनी भाजपाबरोबर संधान साधलं होतं. भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार येईल हे २०१९ मध्ये ठरलं होतं. २०१९ ला शिवसेना आणि भाजपा यांच्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरुन भांडण झालं आणि त्यांचं फाटलं होतं. त्याआधीच सरकार बनवायचं ठरलं होतं. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं होतं की मी शब्द दिला होता पण मला शक्य नाही. मग ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले पुढे काय झालं माहित आहेच. अजित पवार यांनी शब्द पाळला मात्र शरद पवारांनी तो पाळला नाही असंही भुजबळ म्हणाले होते.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांना माहीत होता आणि त्यांच्या सांगण्यावरुनच गोष्टी घडल्या होत्या. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी भाजपाशीही बोलणी सुरु ठेवली होती. मात्र ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीची ही खेळी शरद पवारांशिवाय अधुरी होती हे अधोरेखित झालं आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.