राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज दिवसभर पथकाकडून चौकशी सुरू होती. बारा तासाच्या चौकशीनंतर ईडीचे पथक मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांनी बरीचशी कागदपत्रे हाती घेतल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत त्यांनी माध्यमांची कसलाही संवाद साधला नाही.
मुश्रीफ समर्थक एकत्र
ईडीचे पथक परतल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्ते जमले. त्यांच्यासमोर बोलताना गोकुळचे संचालक नावीद मुश्रीफ यांनी ‘पथकाला योग्य ती उत्तरे दिली आहेत. त्यांना साधा कपटाही सापडला नाही. आकसातून कारवाई केली होती. कागलमध्ये छापा पडणार असल्याची चर्चा होती. मात्र जनतेचे पाठबळ आहे तोवर आमच्या केसालाही धक्का लागणार नाही. अशा कारवायांना मुळीच घाबरणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा- अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, हसन मुश्रीफांचा उल्लेख करत म्हणाले “त्यांची जबान…”
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केली. कोणीतरी सांगते म्हणून आजची कारवाई झाली. व्यापाऱ्यांवर कारवाई झाली की लोक पळून जातात पण आज हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होत असताना हजारो लोक जमून त्यांनी कारवाईवर आक्षेप घेतला. लोकशाहीमध्ये पराभव करता येत नाही या रागातून षंढ प्रवृत्तीचे माणसे अशी कारवाई करायला लावतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.