सातारा : शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये हे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ठरवून दिलेले दरपत्रक. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी अशा एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली असून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी केलेला खर्च उमेदवाराला निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. उमेदवारांनी केलेल्या खर्च आणि सादर केलेल्या खर्चाची निवडणूक शाखेकडून पडताळणी केली जाणार आहे. या वेळी निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची उभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाखांची होती. यामध्ये या वेळी वाढ करण्यात आली आहे. बैठका, सभा, रॅली, जाहिरात पत्रक, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे. हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवारांना राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडावे लागते. अर्ज दाखल करताना उमेदवाराला खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्यामध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे दरही ठरवण्यात आले आहे. त्यानुसार दुचाकी एक दिवसासाठी एक हजार शंभर रुपये, रिक्षा १३०० रुपये, हलके वाहन ३ हजार ३०० रुपये, मध्यम वाहन ३९००, उच्च दर्जाचे वाहन ५१०० रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. बँडपथक वीस माणसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये, पाच माणसांचे पोवाडा पथक पाच हजार रुपये, तीन माणसांचे हलगी पथक १५०० रुपये, २० जणांचे झांजपथक १० हजार रुपये, शिंगवादन प्रतिव्यक्ती तीनशे रुपये, बँजो ग्रुप चार माणसांसाठी तीन-चार तासांसाठी २५०० रुपये, पुष्पगुच्छ मोठा २२० रुपये, पुष्पगुच्छ मध्यम १८० रुपये, पुष्पगुच्छ लहान शंभर रुपये, हार मोठा ३२५, मध्यम २३५ रुपये, लहान १२५ रुपये असा दर ठरवण्यात आला आहे.

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

हेही वाचा >>>Daily Fuel Rates : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! चेक करा तुमच्या शहरांतील आजचा भाव काय असणार?

पदार्थ आणि दरपत्रक

चहा आठ रुपये, कॉफी १२ रुपये, बिस्कीट पुडा दहा रुपये, कोल्ड्रिंक वीस रुपये, कोकम सरबत, लस्सी, पोहे, उपीट, शिरा प्रत्येकी १५ रुपये, वडापाव १० रुपये, इडली २५ रुपये, मिसळ ४९ रुपये, समोसा पंधरा रुपये, शाकाहारी जेवण सत्तर रुपये, मांसाहारी जेवण १२० रुपये.

उमेदवारांचा निवडणूक खर्च हा वरील दरांप्रमाणे हिशेबात धरला जाईल. मद्य, अमली पदार्थ, सिगारेट अशा काही वस्तूंच्या वापरास बंदी आहे. त्या वस्तू वापरल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच या वस्तू वापरल्यास प्रचलित बाजारभावाप्रमाणे वस्तूची नोंद खर्चात समाविष्ट करण्यात येईल.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा</strong>

Story img Loader