राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय आज मुख्यमंत्री, टास्क फोर्स सदस्य व शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत होणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आज पत्रकापरिषदेत बोलताना दिली आहे. तर, राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास कालच शिक्षण विभागाकडून परवानगी दिली गेलेली असून, तशा मार्गदर्शक सूचना देखील काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता आजच्या बैठकीत आणखी काय निर्णय होतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलेले आहे की, त्या त्या ठिकाणचा विभाग यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सक्षम राहील. परंतु एक नक्कीच आहे की टास्क फोर्सच्या सदस्यांनी शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याबाबत विरोध दर्शवला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स व शालेय शिक्षण विभाग यांच्याबरोबर आज बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत त्यांचा अंतिम निर्णय होईल, त्यामुळे शाळेच्याबाबतीत जो काही निर्णय आहे, त्याबाबात कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निर्णय होईल. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांची बैठक होईल. मी स्वतः उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांशी बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की, प्रत्येक विद्यापिठाचे कुलगुरू व त्या विद्यापिठाच्या अंतर्गत येणारे जेवेढे काही जिल्हे आहेत. त्यांच्या शैक्षिण संस्थांसोबत चर्चा करून, ते दोन-चार दिवसात आरोग्य विभागाला त्याचा अहवाल देणार आहेत आणि नंतर त्याबाबत अंतिम निर्णय महाविद्यालयांसंदर्भात होईल.

राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासूनच

तर, राज्यात करोनामुक्त भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आल्यानंतर आता शहरी भागांतील आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास ठाकरे सरकारची परवानगी

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे.. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. याचबरोबर, सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. तर, त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे.