शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून एक मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटासाठी ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे. दोन्हा गटांकडून निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा करण्यात आली होती. आयोगाच्या या निर्णयावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Andheri by-election : महाविकासआघाडी गुरुवारी उमदेवारी अर्ज दाखल करणार – अनिल परब

“मी खूप समाधानी आहे आणि खूप आनंदही झालेला आहे की जे तत्त्व, बाळासाहेबांचं हिंदूत्व घेऊन आम्ही जे पुढे चाललो आहोत आणि तेच नाव आम्हाला मिळालं आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे. चिन्हांबाबत निवडणूक आयोगाकडून आम्हाला उद्या सकाळपर्यंत वेळ मिळालेली आहे आणि तोपर्यंत आम्ही विचारविनीमय करून चिन्ह देऊ. जी भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो, जो उठाव केला होता. बाळासाहेबांचं हिंदूत्वाचं तत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार. तेच नावा आता आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचां आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे.” अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

PHOTOS : शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया

“बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आम्ही मागितलं होतं आणि परत एकदा हे सिद्ध झालेलं आहे की, हा शिंदे गट नसून ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. सेना आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची. मला वाटतं हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. जे मागितलं होतं कदाचित याच्या विरोधात आता न्यायालयात गेले नाहीत, कारण कुठल्याही निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची सवय झालेली आहे. न्यायालयात गेले नाहीत तर हे नाव आम्हाला मिळेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही परत एकदा चिन्ह जमा करू. आम्हाला अजुनही खात्री आहे की भविष्यात नक्की आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल. हे शिवसेनेचं चिन्ह आहे आणि हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळेल, याची आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहेत.” अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी दिली आहे.

हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.