वाई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या साताऱ्यातील किल्ले प्रतापगडाच्या (ता महाबळेश्वर) पायथ्याशी असणारी अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीच्या अवतीभवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम शासनाच्या आदेशाने  जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. अफजलखान आणि सय्यद बंडाची कबरीवरील देखील सर्व बांधकाम आणि भिंतीही नष्ट करण्यात आल्या आहेत. गुरुवारी १० नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास प्रतापगड येथील अफजल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास प्रशासनाने सुरूवात केली. त्यानंतर दिवसभर अफजल खानाच्या कबरीला कोणताही धक्का न लावता, कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.रात्री दोन वाजे पर्यंत हे काम सुरु होते.

अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी आठ दिवसांपूर्वी सातारा प्रशासनाला शासनाने आदेश दिले होते. यासाठी सातारा,पुणे सोलापूर,कोल्हापूर,सांगली रायगड ग्रामीण या चार जिल्ह्यातील अठराशेहुन अधिक पोलीस बंदोबस्त वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात बुधवारी रात्री पासून दाखल झाला होता.पहाटे सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली.तेथील अनधिकृत बांधकाम पहाटेपासून हटविण्यास सुरवात झाली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,पोलीस अधीक्षक समीर शेख,वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव,पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे,महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील चौधरी आदी  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम पाडण्यास सुरवात झाली.यासाठी फार मोठी यंत्रसामुग्री,कामगार नेमण्यात आले होते.

Protest In Shimla Against Alleged Illegal Construction Of Mosque
हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी
Panvel, administrative building Panvel,
पनवेल : प्रशासकीय भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ‘त्या’ तीन गाळे मालकांचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला
expert committee change in policy for determining height of statues
पुतळ्यांची उंची ठरविण्यासाठी धोरणात बदल; तज्ज्ञ समितीची शिफारस, लवकरच १५ दिवसांत घोषणेची शक्यता
Pune, liquor, Ganesh utsav, violation,
पुणे : गणेशोत्सवात मध्यभागात मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
shivaji maharaj forts, UNESCO, UNESCO Pune visit,
शिवरायांच्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी ‘युनेस्को’ची समिती येणार पुणे दौऱ्यावर
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश

अफझल खानच्या कबरी परिसरात तब्बल २६ वर्षांपासून १४४ हे ज्माब्दीचे कलम लागू होते.अफजल खानच्या कबरी लगत तब्बल साडेपाच हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं.हे अतिक्रमण तोडण्याचा आदेश प्रतापगड उत्सव समितीच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.आज पर्यंतच्या सरकारने ठोस कारवाई  न केल्यामुळे अखेर प्रतापगड उत्सव समितीने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. २०१७ मध्ये हायकोर्टाने सरकारला बांधकाम तोडण्याचा आदेश दिला होता.१० नोव्हेंबर १६५९  रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. तेथेच अफजल खान व सय्यद बंडाचा अंत्यविधी करून कंबर केली होती.१९५६ नंतर या ठिकाणी अनधिकृत पणे कबर परिसरात वनविभागाच्या हद्दीत अफजल खान मेमोरियल ट्रस्ट ने एक एकर जागेत केलेले अतिक्रमण करण्यात आले .यामध्ये १९ खोल्या दोन  विश्रांतीगृहाचा समावेश होता. अफजलखान कबर परिसरात केलेलं अतिक्रमण  ते संपूर्ण अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने पोलीस संरक्षणात पाडले आहे.

सदरची अतिक्रमण पाडण्याची कारवाई थांबवावी अशी याचिका ऍड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात काल दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली याकामी शासनास अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे., तत्पूर्वी हे संपूर्ण अतिक्रमण पाडण्यात आले आहे. १९८० ते  ८५ साली या ठिकाणी अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली होती. ही बाब हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनात आणून देत २००६ साली या विरोधात मोठं आंदोलन उभारल गेलं होत. अखेर काल रात्री पोलीस बंदोबस्तात हे संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले असून या ठिकाणी फक्त अफजलखान कबर आणि सय्यद बंडा कबर शिल्लक आहे. यामुळे सगळीकडे आनंद व्यक्त केला गेला.साताऱ्यातील मुस्लिम समाजानेही चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अफझलखान कबर परिसरात एक एकर जागेत अतिक्रमण करण्यात आले होते, ते संपूर्ण अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने पोलीस संरक्षणात पाडले आहे. यामध्ये १९ खोल्या दोन विश्रांतीगृहाचा समावेश होता. अफजलखान कबर परिसरात केलेलं अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात प्रशासनाला यश आले.

– रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी,सातारा