सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पुढचा आमदार भाजपाचाच असेल असा निर्वाळा देत आगामी निवडणुकीसाठी आमदार म्हणून  माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनाच लोकांची पसंती असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना सांगितले.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील वाळवा, शिराळा आणि शाहूवाडी विधानसभा मतदार संघातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज झाली. या बैठकीस ग्रामीण जिल्हाध्यक्ष पाटील यांच्यासह पालकमंत्री सुरेश खाडे, मुरली मोहोळ, मकरंद देशपांडे, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, विक्रांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राजू प्रभावळकर, अमरसिंह भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ?
AIMIM , Imtiaz Jaleel, constituency confusion,
इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
pakistan security 1
नंदनवनातील निवडणूक: पाकिस्तानप्रेमी ‘जमात’ आता निवडणुकीच्या रिंगणात
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
Loksatta karan rajkaran Who is the alternative to Sunil Kedar for assembly election 2024  in Savner constituency
कारण राजकारण: सावनेरमध्ये केदार यांना पर्याय कोण?

हेही वाचा >>>> ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…

 बावनकुळे यांनी इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर लोकांशी संवाद साधला. यानंतर जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देव, देश आणि धर्मासाठी कार्यरत असताना देश विकासाचेही काम करीत आहे. यामुळे सामांन्य जनता मोदी यांच्या नेतृत्वावर ठाम विश्‍वास ठेवून आहे. आगामी निवडणुकीतही जनता मोदी यांच्या विचारावरच विश्‍वास ठेवेल याचा विश्‍वास जनतेशी संवाद साधल्यानंतर मिळत आहे.