महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे ‘पुरुषोत्तम करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या २४ डिसेंबरपासून पुण्यात रंगणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे महाअंतिम फेरी न झाल्याने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा राज्यभरातील युवा रंगकर्मींचा पुन्हा नाट्यजल्लोष होणार आहे. राज्यभरातील १८ महाविद्यालयांचे संघ महाअंतिम फेरीत सादरीकरण करणार असल्याने महाअंतिम फेरी चुरशीची होणार आहे.
यंदा पुरुषोत्तम करंडकच्या पुणे केंद्रावरील अंतिम फेरीत मानाचा पुरुषोत्तम करंडक न देण्याच्या परीक्षकांच्या निर्णयामुळे नाट्यक्षेत्रात गदारोळ झाला होता. या निर्णयानंतर बरीच साधकबाधक चर्चाही झाली. त्यानंतर राज्यभरातील विविध केंद्रांवर स्पर्धा झाली. भरत नाट्य मंदिर येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सकाळी नऊ ते एक, सायंकाळी पाच ते नऊ या दोन सत्रांमध्ये महाअंतिम फेरीतील एकांकिकांचे सादरीकरण होईल. तर २६ डिसेंबरला सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. सुबोध पंडे, नितीन धंदुके, संजय पेंडसे महाअंतिम फेरीचे परीक्षण करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा