नागपूर: राज्यात मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत असतानाच भारतीय हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. ११ व १२ जूनला महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची अधिक शक्यता असल्याचे, हवामान खात्याने कळवले आहे.
संपूर्ण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ या भागाला बिपरजॉयचा तडाखा बसणार असणार असल्याने या भागात १५ जूनपर्यंत तर, गोवा, महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पुढचे ११ जून आणि १२ जून या दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर संपूर्ण विदर्भात १५ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मान्सूनपूर्व वादळी पावसाची अधिक शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.