दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. एकीकडे या चित्रपटाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारण केले जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अनेक राज्यात करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे. नुकतंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशभरात उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपनं केली आहे. नुकतंच आदित्य ठाकरेंनी एबीपी न्यूजच्या आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरेंनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही, अशी माहिती दिली. त्यासोबत त्यांनी याबाबतचे कारणही स्पष्ट केले.

Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ऑस्कर पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या

“द कश्मीर फाइल्स हा एक चित्रपट आहे, जेव्हा हे सर्व सुरु होते. तेव्हा त्यांच्यासोबत एकच व्यक्ती उभा होता आणि आजही आम्ही जिथे जिथे जातो, तिकडे असलेल्या काश्मिरी पंडित भाऊ बहिण यांना भेटतो. शिक्षण असू दे किंवा इतर कोणतेही क्षेत्र आता ते फार पुढे गेले आहेत. त्यामुळे मला असे वाटते की चित्रपटापलीकडे आज कश्मीर, जम्मू, लडाख या ठिकाणी काय होत आहे, आपण देशाला कसे पुढे नेऊ शकतो याबद्दल चर्चा व्हायला हवी”, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

“जर या चित्रपटाच्या कमाईतून कश्मिरी पंडितांच्या भविष्यासाठी काही चांगले होणार असेल, तर नक्की प्रत्येकजण त्यात हातभार लावेल. पण मला असेल वाटते की एखादी कला, त्यातील संस्कृती ही त्या जागी असायला हवी. त्याचा मान आपण नक्की ठेवायला हवा. त्याचे कौतुक नक्कीच झाले पाहिजे. पण त्यासोबतच खरी सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल त्याचा इतिहास, भविष्य याविषयी चर्चा व्हायला हवी”, असेही ते म्हणाले.

“द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, असे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही, कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहत आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि त्याचा वापर ते करत आहेत”, असे आमचे मत आहे.

“द कश्मीर फाइल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी”, संजय राऊतांचा सणसणीत टोला

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र विवेक अग्निहोत्रींनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देत म्हटलं की, त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.