संजय राऊत यांची बोलण्याची पातळी इतकी खालावत चालली आहे की त्याबाबत काय बोलणार? देशाचे पंतप्रधान त्यांच्या विषयी बोलताना भान बाळगायला हवं. या देशात काही राजकीय संकेत आहेत. काही सांस्कृतिक संकेत आहेत. काही सामाजिक संकेत आहेत.ज्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतो याचं भान असलंच पाहिजे असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच देशात लोकशाहीचा अतिरेक झाला आहे आपण कुणाला काहीही बोलू शकतो अशी स्थिती सध्या आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पंतप्रधानपद हे आपल्या देशाचं सर्वोच्चपद, त्याबाबत बोलताना आपण काळजी घ्यायला पाहिजे असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. डिग्रीचा विषय चालला आहे तो चालुदेत. पण दोन विरोधी पक्षांनी एकमेकांवर टीका करताना देशाचे पंतप्रधान ज्यांना संपूर्ण जगात स्थान आहे त्यांच्यावर बोलतात? मला तर वाटतं की देशात लोकशाहीचा अतिरेक झाला आहे. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे आम्ही काही बोलू शकतो असं झालं आहे असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर काय म्हणाले चंद्रकांतदादा?

वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तुमचं उदाहरण दिलं की मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. याबाबत प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, “माझ्यासारख्या गिरणीकामगारांच्या मुलाचं नाव वारंवार घेतलं जातं आहे हे चांगलंच आहे. पण माझं हे उद्धव ठाकरेंना सांगणं आहे की तुम्ही जसे व्हिडीओ लावता तसं मी उद्धवजींना सांगणं इतकंच आहे की झोपेचं सोंग घेतलेल्या जागं करता येत नाही. माझ्या ज्या ज्या वाक्यांवरून वाद निर्माण केले गेले, तशी फार कमी वाक्यं आहेत. मात्र मी उद्धवजींना सांगू इच्छितो की व्हिडीओ लावू आणि मी काय म्हटलं आणि काय चुकलं ते सांगा. थोडक्यात सांगायचं झालं तर भाषणाचे मुद्दे संपले आहेत. त्यामुळे त्याच्या त्या जुन्या आठवणींमध्ये रमत आहेत. ” असंही चंद्रकांतदादा म्हणाले.

मविआवर टीका

महाविकास आघाडीला एकत्र राहणं क्रमप्राप्त आहे. कारण अस्तित्वाची लढाई प्रत्येकाला लढावीच लागते. आत्ता मविआची अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळेच कसब्यात बंडखोर उभा राहिला नाही. वज्रमूठ वगैरे त्यांचा अधिकार आहे पण ती भीतीतून आहे. एकत्र राहू की नाही याला अद्याप खूपच महिने आहेत असंही दादांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The level of democracy has increased a lot in this country what chandrkant patil said about sanjay raut scj
Show comments