महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावाजवळ घडवून आणलेल्या शक्तीशाली भूसुरुंग स्फोटात सी-६० कमांडो पथकाचे १५ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांच्या या हिंसक कृत्याचा समाजातील सर्व स्तरातून निषेध होत आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहताना नक्षलवाद्यांना या कृत्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागेल असे नितीन गडकरी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला.
गडचिरोली में माओवादियों द्वारा हमारे सुरक्षा दलों पर किए गए हमले में शहिद हुए वीर जवानों को भावभीनी श्रद्धांजलि। माओवादियों को इस कायराना हरकत की भारी कीमत चुकानी पड़ेगी।
— Chowkidar Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 1, 2019
शरद पवारांनी मागितला राजीनामा
दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही’, असा टोला शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.