राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापेललं आहे. विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू केलेली आहे. याशिवाय राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवण्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे खासदार उदयनराजे यांनीही राज्यपाल कोश्यारींना हटवण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानेही आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलनास आजपासून सुरूवात केली. औरंगाबादेत राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर आज मोठ्यासंख्येने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकाचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे पोहचवू असे आश्वासन दिले.

राज्यपालांची हकालपट्टी करण्यासाठी तुम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना बोलणार का?, सभागृहात हा विषय मांडणार का?, ही रास्त मागणी घेऊन आम्ही आमचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या आलो आहोत, यावर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करावी. असं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटल्यावर याला उत्तर देताना सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले, “तुम्ही तुमचं निवेदन मला दिलं. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत तुमचं म्हणणं पोहचवण्यासाठी मी एक मधला दूवा म्हणून मी नक्कीच भूमिका पार पाडेन.” तर, शिवभक्त म्हणून तुमच्या काय भावना आहेत? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर सावे म्हणाले, की “मी शिवभक्त आहेच आणि शिवभक्त म्हणूनच सांगोतय की तुमचं जे म्हणणं आहे, ते मी वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याची पूर्णपणे जबाबदारी घेतो.”

Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra vidhan sabha election 2024 rebels certain in five constituencies of amravati district
Rebellion In Amravati District :अमरावती जिल्‍ह्यात पाच ठिकाणी बंडखोरी अटळ
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
gadchiroli vidhan sabha election 2024
गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?
maharashtra assemly election 2024 Rebellion challenge of Dr Devrao Holi and Ambrishrao Atram for BJP in aheri and gadchiroli Constituency
भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….
There was no attack on BJP rebel candidate Vishal Parab car
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला नाही,तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार
Ajit Pawar met rebel Nana Kate, Ajit Pawar latest news,
बंडखोर नाना काटेंची अजित पवारांनी घेतली भेट; महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू

“महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत कुठल्याही थोर पुरुषांचा अपमान कधीही जनतेने सहन केलेला नाही. त्यामुळे तुमची भावना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवण्याचं मी काम करेन.”

राज्यपाल हटवा, महराष्ट्र बचाव अशी मोहीम मराठा क्रांती मोर्चाकडून आजपासून राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोल वाजवा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.