राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापेललं आहे. विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू केलेली आहे. याशिवाय राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवण्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे खासदार उदयनराजे यांनीही राज्यपाल कोश्यारींना हटवण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानेही आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलनास आजपासून सुरूवात केली. औरंगाबादेत राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर आज मोठ्यासंख्येने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकाचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे पोहचवू असे आश्वासन दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा