राज्याची मंत्रिमंडळ बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयांवर चर्चा झाली. तसंच, राज्याची अर्थव्यवस्थेचे १ ट्रिलिअन डॉलर्सचे उद्दीष्ट्य गाठण्याच्या उद्देशानेही आजची बैठक महत्त्वाची ठरली.

बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X वर पोस्टद्वारे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली असून १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. तर, राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्यात आला आहे. तसंच, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकणार आहेत. याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलिअन करणार असल्याचं आश्वासन देण्यात येत होतं. त्यानिमित्ताने पुढचं पाऊल पडलं आहे.

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज सादरीकरण करण्यात आले. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी समोर आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या शिफारशींचा सरकारकडून अभ्यास केला जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

Story img Loader