पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आहे. या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र ते असत्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आता आज त्यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता. तसंच या सगळ्याची बोलणी थेट शरद पवारांशी झाली होती. त्यांना आम्ही शपथ घेणार हे माहित होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या सगळ्यावर विचारलं असता शरद पवारांनी मात्र देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत असल्याचं म्हटलं. मात्र आता पहाटेचा शपथविधी झाल्यामुळे एकच चांगलं झालं राष्ट्रपती राजवट उठली असं त्यांनी म्हटलं आहे.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

२३ नोव्हेंबर २०१९ ला नेमकं काय घडलं होतं?

२३ नोव्हेंबर २०१९ ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता. आज मात्र त्यांनी या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार म्हणाले आहेत.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काय म्हटलं आहे?

दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितलं आहे.