के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आता खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु, ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असून ठाकरे गटाकडून येथे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली असून महायुतीमधून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका सभेला संबोधित करताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा. ज्यांनी कामे केली त्यांना निवडून आणा. ज्यांनी कामे केली नाहीत, त्यांना निवडून पाडा. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. देशोधडीला लागलो आहे. इतर समाजाचं आणि शेतकऱ्यांचं काम मी करतोय. वीज बील, पिक विमा, पीक कर्ज, पिण्याच्या पाण्याचे कर्ज यासाठी सातत्याने आंदोलने आणि लढाई करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की लढलं पाहिजे, म्हणून मी अपक्ष लढणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये टॅक्ट्रर चिन्हावर दोन लाख ८३ हजार ७९८ मते मिळविणारे हर्षवर्धन जाधव यांनी निवडणुकीच्या रिंगणातील सोंगट्यांची ताकद आपल्या बाजूने वळविली होती. मराठा आरक्षणासाठी निघालेले मोठे मोर्चे आणि त्यानंतरच्या वातावरणात मताचे नवे ध्रुवीकरण करण्यास त्यांना यश आले होते.

हेही वाचा >> बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत होणार?

‘मराठा’ समाजाचे ध्रुवीकरण व्हावे अशी रचना करण्यात यश मिळविणारे हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये व त्यानंतर शिवसेनेमध्येही काम केले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक मात्र त्यांनी अपक्ष लढवून लक्षणीय मते मिळविल्याने शिवसेनेचे उमेवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व छत्रपतीसंभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलील २०१९ मध्ये निवडून आले. आता पुन्हा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्याने पुन्हा एकदा अटीतटीची लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The only mla to resign for maratha reservation harshvardhan jadhav to contest lok sabha elections but from which party sgk