व्हेल माशाच्या उल्टीची (अंबरग्रीस) बेकायदा वाहतूक करणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने संयुक्त कारवाई करून शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे-बंगळूरु महामार्गाजवळील सरनोबत वाडी येथे व्हेल माशाच्या उल्टीची (अंबरग्रीस) विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने सापळा लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- MP Road Accident: मध्य प्रदेशात भीषण अपघात! बसने दिलेल्या धडकेत महाराष्ट्रातील ११ कामगार ठार; गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले मृतदेह

येथे व्हेल माशाची उल्टी घेऊन आलेल्या प्रदीप भालेराव, शकील शेख, आमीर पठाण या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ कोटी ४१ लाख रुपयांची उल्टी, साडेतीन लाख रुपयांची मोटार असा सुमारे ३ कोटी ४४ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, वन विभागाचे रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी केली.