सांगली : दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीसांचे वाहन पलटी होऊन तीन पोलीस जखमी झाल्याची घटना सोमवारी मिरजेजवळ बेडग रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पोलीसांचे निर्भयापथक गस्तीवरुन परत येत असताना समोरुन येत असलेल्या प्रयत्नात वाहन बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाले. यामध्ये पोलीस कर्मचारी संभाजी भेंडे, अजित कोळेकर व इरकत्ता येवन्नावर हे किरकैळ जखमी झाले. दुचाकीस्वार महादेव निवलगी (रा. मदभावी, ता.अथणी) हा गंभीर जखमी झाला आहे.
First published on: 09-10-2023 at 20:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police vehicle overturned while trying to save the biker sangli amy