रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

लातूर: ‘आयव्हीएनएल’ आणि ‘जेएससी मेट्रो वॅगन नॅश’ या रशियातील मास्को येथील कंपनीबरोबर करार पूर्ण झाले असून, त्यांनी ‘वंदे भारत’च्या रेल्वे डब्यांच्या निर्मितीच्या निविदा भरल्या आहेत. जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये प्रत्यक्षात वंदे भारत रेल्वेचे डबे लातूर येथून निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. रविवारी त्यांनी डबेनिर्मितीच्या कारखान्यास भेट देऊन पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दानवे म्हणाले, की सात वर्षांमध्ये १२० रेल्वे बाहेर पडतील. १२, १५, १८ व २५ रेल्वेंची बांधणी होईल या टप्प्याने काम होणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास पुन्हा ८० वंदे भारत रेल्वेचे काम हे लातूरच्या कारखान्यात होणार आहे. आतापर्यंत देशात वंदे भारतच्या डब्यातील आसन व्यवस्था बसण्यासाठी केलेली आहे. लातूरच्या रेल्वे डबेनिर्मिती कारखान्यात ‘बर्थ’च्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या भागात छोटय़ा उद्योजकांना कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. टप्प्याटप्प्याने तो वाढत जाईल असा दावाही दानवे यांनी केला. लातूर डबेनिर्मिती कारखान्यामध्ये वंदे भारत रेल्वे निर्मितीचे कंत्राट ४० हजार कोटींचे असून, रेल्वेची ३५ वर्षे देखभाल-दुरुस्तीदेखील हीच कंपनी करणार आहे.