मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे. तसंच कुणावरही अपात्रतेची कारवाई नाही असा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी आमदार अपात्रता सुनावणीवर दिला. यावरुन राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जाते आहे. याच निर्णयावर असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या निकालामुळे मला आश्चर्य वाटल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल बुधवारी दिला आहे त्याचं मला आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं कारण अध्यक्ष १० व्या सूचीला विसरुनच गेले. संविधानात दहावी सूची नाहीये का? आता काय होतं आहे पाहू आपण. जनता महाराष्ट्रात काय घडतं आहे ते पाहते आहे. कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलले जात आहेत. अनेक लोक वेगळ्या रंगाचे कपडे घातल्याप्रमाणे पक्ष बदलत आहेत. आमचा रंग एकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह जायचं का? याचा निर्णय पुढे घेऊ, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

इम्तियाज जलील पुन्हा खासदार होतील असा विश्वास वाटतो

निवडणुकीच्या दृष्टीने आमची तयारी उत्तम प्रकारे चालली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की इथली जनता पुन्हा एकदा आम्हाला निवडून देईल. इम्तियाज जलील खासदार पुन्हा खासदार होतील अशी आशा आहे. इथल्या प्रत्येक समुदायासाठी त्यांनी काम केलं आहे. असंही ओवैसी म्हणाले आहेत. वर्षानुवर्षे जे खासदार होते त्यांनी काहीही केलं नाही मात्र जलील यांनी चांगलं काम केलं त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देईल असंही ओवैसी म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बुधवारी सविस्तर निकाल दिला. या निकालपत्रात राहुल नार्वेकरांनी मूळ शिवसेना कुणाची इथपासून ते दोन्ही बाजूंनी दोन्ही गटातील आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिकांवर केलेल्या युक्तिवादांवर निकाल दिला. या निकालानंतर त्यावर ठाकरे गट व काँग्रेस-राष्ट्रवादीकडून परखड शब्दांत टीका करण्यात आली आहे. हा निकाल म्हणजे भाजपाचीच स्क्रिप्ट असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर आता ओवैसी यांनीही या निकालावर टीका केली आहे.

Story img Loader