राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेद पदवी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पदवी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राला उद्देशून भाषणही केलं. तसंच, ही पदवी म्हणजे शेवट नसून मध्यांतर आहे. यापुढेही महाराष्ट्रासाठी असंच कार्य करत राहणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले.

“ही पदवी देण्याकरता ज्या निकषांनी माझा विचार झाला त्यामध्ये पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समता आहे. आज आपण पायाभूत सुविधांचा विचार केला तर मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या वाटचालीत जपानचा खूप मोठा वाटा आहे. मेट्रो तीनकरता जपानच्या जायकाने जवळपास २० हजार कोटी दिले. ट्रान्स हार्बर लिंक सुरू करण्याची संधी मला मिळाली, देशातील सर्वांत मोठा सी ब्रिज आहे, त्याकरता १८ हजार कोटी जपान सरकारने दिले. वेगवेगळ्या मेट्रो, बुलेट ट्रेन आणि विविध प्रकल्पांकरता प्रचंड मोठी मदत जपान सरकारने सातत्याने केली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान, जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळवणारे पहिले भारतीय

महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल

“पायाभूत सुविधांचं कार्य या महाराष्ट्रात २०१४ नंतर सुरू केलं. हे कार्य पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्र पायाभूत सुविधेत देशातील अग्रगण्य राज्य बनेल. पायाभूत सुविधा ही विकासाची गुरूकिल्ली आहे. मला अतिशय आनंद आहे की हा सन्मान देताना औद्योगिक विकासाचाही विचार झाला. सातत्याने महाराष्ट्र मागच्या काळात एफडीआयमध्ये नंबर एक आहे. स्टार्टअप पॉलिसीचा परिणाम असा आहे की देशाचं स्टार्टअप कॅपिटल गुजरात किंवा हैदराबाद नसून महाराष्ट्र आहे हे नुकत्याच झालेल्या सर्वेतून समोर आलं आहे. कोणतंही राज्य पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला सुशासन असायला हवं. सुशासन असेल तर राज्य कोणीच थांबवू शकत नाही. महाराष्ट्रात खूप चांगलं सुशासन आहे”, असंही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न सुरू

“महाराष्ट्राला सामाजिक समतेचा इतिहास आहे. डॉ.आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्यामुळे संधीची समानता मिळाली. जोपर्यंत सामाजिक- आर्थिक परिवर्तन येणार नाही, सामाजिक -आर्थिक समता येणार नाही तोपर्यंत आमचा देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या समाजाला एकत्र घेऊन आपल्याला पुढे कसं नेता येईल, संधी कशा निर्माण करता येतील, याचा प्रयत्न सुरू आहे”, असंही फडणीसांनी स्पष्ट केलं.

मानद डॉक्टरेट महाराष्ट्रातील जनतेला समर्पित

“आज ही उपाधी मिळाली असली तरीही ती मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. कारण त्यांच्याशिवाय ही संधी कधी मिळाली नसती. अशाप्रकारचे एखादा पुरस्कार मिळाले की तो शेवट नसतो, मध्यांतर असतं. ती एक प्रेरणा असते. त्याकडे बघून मागच्या काळात आपण काय चांगलं करू शकलो हे बघायचं असतं. पुढे काय चांगलं करू शकू याचा विचार करायचा असतो”, असं फडणवीस म्हणाले.

मोदींच्या नवभारताचा रस्ता महाराष्ट्रातून जातो

“महाराष्ट्र हे असिमित शक्ती असलेलं राज्य आहे. ही शक्त इतर कोणत्याच राज्यात नाही. मोदी नवभारत निर्मित करू इच्छितातात, शक्तीशाली भारत, ५ ट्रिलिअन इकोनॉमी करू इच्छित आहेत, त्या भारताकडे जाण्याचा रस्ता महाराष्ट्रातून जातो, त्यामुळे महाराष्ट्रच खरी गुरूकिल्ली आहे. अधिक चांगल्या प्रकारे हे कार्य कसं करता येईल, मला विश्वास आहे की आव्हाने असतात. अनेक गोष्टी आपल्यासमोर असतात. आव्हानांचा सामना करायचा असतो. पण दृष्टी दूरच ठेवायची असते”, असं ते म्हणाले.

“२०३५ साली महाराष्ट्र ७५ वर्षांचा होईल. माझी नजर त्या महाराष्ट्राकडे आहे. ७५ वर्षांचा माझा महाराष्ट्र कसा असला पाहिजे. ७५ व्या वर्षी महाराष्ट्राने काय घडवलं पाहिजे. महाराष्ट्रातील नागरिकांचं २०३५ साल कसं असेल. त्यावेळी तो महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचं मानचित्र तया करण्याचा प्रयत्न करतोय” असंही ते म्हणाले.