राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्शअवभूमीवर आज राज्यातील करोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाईन संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवून दररोज अडीच लाख चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले,“ हा विषाणू वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतो आहे आणि आपली परीक्षा बघतो आहे. आपल्या सर्वांना धैर्याने लढण्याची आवश्यकता आहे. लॉकडाउन करणार का? या प्रश्नाचं मी अजूनही उत्तर देत नाही. पण साधारण आताची परिस्थिती काय आहे, याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते.”

तसेच “ जेव्हा करोनाची साथ सुरू झाली, आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यात केवळ दोनच या विषाणूची चाचणी जिथं होऊ शकते, अशा प्रयोगशाळा होत्या. एक मुंबईत व दुसरी पुण्याला आज त्या दोनच्या जवळपास आपण ५०० पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था किंबहुना प्रयोगशाळा तयार केल्या आहेत. मुंबईत देखील आपण साधरणपणे दरदिवशी ५० हजार चाचण्या आज करतो आहोत. मागील काही दिवसांमध्ये राज्यात जी आपली क्षमता होती, ७५ हजार चाचण्या दरदिवशी करण्याची, ती आपण वाढवून जवळपास १ लाख ८२ हजारापर्यंत आपण नेलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही संख्या आपल्या अडीच लाखांवर न्यायची आहे. अडीच लाख चाचण्या दरदिवशी महाराष्ट्रात लवकरात लवकर आपण करणार आहोत. या चाचण्या रॅपिड अॅन्टीजनने नाही, त्याचं जे प्रमाण आहे, केंद्राची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत. साधारपणे ७० टक्के चाचण्या या आरटीपीसीआर या पद्धतीने झाल्या पाहिजेत.” असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

याचबरोबर “ आरटीपीसीआरमध्ये अचूकता जास्त असते, म्हणून आपणही आणि केंद्राने देखील जेवढ्या चाचण्या आपण करतो त्यातील किमान ७० टक्के चाचण्या या आरटीपीसीआर असायालाच पाहिजे, असं सांगितलं आहे. याचप्रमाणे राज्यात चाचण्या सुरू आहेत. भविष्यात देखील आपण आरटीपीसीआर चाचण्या अधिक ठेवणार आहोत. म्हणजेच आपण कुठेही दर्जाशी तडजोड करत नाही आहोत व करणार देखील नाही. काहीही आपण लपवत नाही व लपणार नाही. एक देखील रूग्ण आपण लपवलेला नाही व लपवत देखील नाही. म्हणून महाराष्ट्रातील परिस्थिती सगळ्यांना धक्कादायक जरी वाटत असली तरी, आपण सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवत आहोत. ” असं देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“ राज्यात आजपर्यंत ६५ लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे. काल दिवसभरात तीन लाख नागरिकांना लसीकरण झालं. अजूनही आपण मागणी करतोय, केंद्र आपल्याला देतंय पण पुरवठा वाढवायला पाहिजे आणि पुरवठा वाढवल्यानंतर आपली क्षमता आज जी तीन लाख आहे ती लवकरात लवकर किमान सहा ते सात लाख दर दिवशी करण्याची आपली क्षमता आहे. पण तेवढ्या लसींचा पुरवठा झाला पाहिजे.” असं यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलून दाखवलं.