वाई:जालना येथील लाठी चार्जची घटना दुर्दैवी असून या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. या घटनेमागे जो कोण आहे तसेच पोलिस प्रशासनाचे काही चुकले असेल तर त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शिक्षा होईल. आता मराठा समाजाने संयम बाळगला पाहिजे, हिंसक होऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन हे माध्यम असते. कुठल्याही आंदोलकांवर लाठीचार्ज होणं हे योग्य नाहीच. जालना येथे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी घटना आहे. याची चौकशी झालीच पाहिजे. कुणाच्या चुका झाल्या असतील त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शिक्षा होईल. मराठा बांधवांनी संयम बाळगला पाहिजे. आजपर्यंत लाखोचे जे मोर्चे आपण शांततेच्या मार्गाने काढले.त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यापुढे ही समाजाने हिंसक होऊ नये, ही विनंती. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी कायम मराठा बांधवांच्या बरोबर आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई आपण जिंकुच आणि आपलं गेलेलं आरक्षण आपल्याला परत मिळेल अशी अपेक्षा आहे. या सगळ्या घटनेच्या मागे कोण असेल अगदी पोलिस प्रशासन चुकलं असेल तरी पण कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा >>>नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात उपचार सुरू

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि न्यायालयातही टिकले.पण, फडणवीस यांचा पायउतार झाल्यावर आरक्षण न्यायालयातून गेलं. सध्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून आरोप होत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होत. पण ठाकरे सरकार आल्यावरच हे आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The statement of shivendrasinhraje bhosle that the incident of lathi charge in jalna is unfortunate amy