सुशीलकुमार शिंदे /प्रसाद हावळे

मराठवाडा

Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Deepak Kesarkar, Rajan Teli , Sawantwadi Assembly
सावंतवाडी विधानसभेचे प्रतिस्पर्धी दिपक केसरकर व राजन तेली…
There was no attack on BJP rebel candidate Vishal Parab car
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला नाही,तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार
call has been made to destroy Ranamodi plant by burning it during Narakasura and Holi festival
वनस्पती रानमोडीचा नरकासूर‌ समजून दहन
Devendra Fadnavis on Raj Thackeray
Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
Amit Thackeray Code of Conduct
Shivsena UBT Letter : मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “जे. जे. स्कूल ऑफ आर्ट नसतं तर मी प्लंबर, फिटर किंवा..”, काय म्हणाले राज ठाकरे?
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
Prakash Ambedkar Health Update
Prakash Ambedkar Health Condition : वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल!

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांचा ‘द स्ट्रेलेमा’ने घेतलेला हा अनुभवनिष्ठ धांडोळा…

पाणी, शेती, रोजगार यांसंबंधीच्या प्रश्नांची तड कधी लागते, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्यात गेले वर्षभर मराठा आरक्षणाच्या मागणीने वातावरण तापलेले राहिले. त्यापूर्वी झालेली शिवसेनेतील फूट आणि भाजपसमवेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती याही घटना येथील हिंदुत्ववादाकडे झुकलेल्या मतदारांना पाहायला मिळाल्या. त्याआधीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अभूतपूर्व महाविकास आघाडीचेही पडसाद मराठवाड्यात उमटले होतेच. या पार्श्वभूमीवर, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर अशा एकूण आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणाऱ्या मराठवाड्यात यावेळी तब्बल तीन टप्प्यांत निवडणूक पार पडली. नेहमीपेक्षा वेगळ्या ठरलेल्या या निवडणुकीत मराठवाड्यात नेमके काय झाले?

सुरुवात करू जालन्यापासून. मराठा आरक्षण आंदोलन ज्या आंतरवाली सराटीतून सुरू झाले, तो हा मतदारसंघ. येथे गेली २५ वर्षे खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे भाजपकडून सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली. तर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान चर्चेत आलेले मंगेश साबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे येथील निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप आले. मराठा समाजातील मतदारांचे ध्रुवीकरण झाल्याने सुरुवातीला, विशेषत: फुलंब्री, सिल्लोड व पैठण या विधानसभा मतदारसंघांतील मराठा मतदारांचा कल साबळे यांच्या बाजूने दिसला. परंतु शेवटच्या टप्प्यात हा कल काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांच्याबाजूने झुकू शकतो अशी शक्यता निर्माण झाली. तसेच दलित आणि मुस्लीम मतदारांचा कलही प्रामुख्याने कल्याण काळे यांच्या बाजूने दिसला. भोकरदन आणि जालना शहर या दानवे कुटुंबीयांचा वैयक्तिक प्रभाव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमधील ओबीसी मतदारांबरोबरच बऱ्याच प्रमाणात मराठा मतदारांचाही कल दानवे यांच्या बाजूने दिसला. सुरुवातीच्या काळात मराठवाड्यातील भाजपसाठी खात्रीशीर समजल्या जाणाऱ्या जालना मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षांची सिल्लोड आणि पैठण विधानसभा मतदारसंघात हवी तशी साथ न मिळाल्याने जालन्याची लढत कमालीची चुरशीची झालेली दिसून आली. जालना लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत मराठा मतदारांचे त्रिभाजन जितके जास्त झाले असेल, तितका दानवे यांचा मार्ग सुकर राहील असे चित्र आहे.

हेही वाचा >>> मल्लिकार्जुन खरगेंचा व्हिडीओ ट्विट करत बावनकुळेंचा राऊतांना खोचक सल्ला; म्हणाले, “यावरही भ्रष्टलेख लिहा”

जालन्याप्रमाणेच बीड मतदारसंघातही यावेळी जातीय ध्रुवीकरणामुळे अटीतटीची लढत झालेली पाहायला मिळाली. येथे भाजपच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात झालेली थेट लढत वंजारी-मराठा ध्रुवीकरणामुळे चुरशीची ठरली. या मतदारसंघात मराठा मतदार जसा एकवटला, तसेच दुसऱ्या बाजूने वंजारीसोबत अन्य ओबीसी जातीही एकवटल्या. वंजारी, धनगर, माळी आणि बंजारा समाजातील मतदारांचा कल पंकजा मुंडे यांच्या बाजूने दिसला. त्यासोबतच बीडमधील तेली समाजातील मतदारांचा कल येथे निर्णायक ठरेल. मुस्लीम, दलित आणि प्रामुख्याने मराठा मतदार सोनवणे यांच्या बाजूने झुकलेला राहिला. याचा फायदा केज, माजलगाव, गेवराई येथे सोनवणे यांना होऊ शकतो. परंतु आष्टी विधानसभा मतदारसंघातील मराठा मतदार पंकजा मुंडे यांच्याकडे वळवण्यात येथे आमदार सुरेश धस यशस्वी ठरताना दिसले. परळी विधानसभा मतदारसंघातही पंकजा मुंडे यांना मराठा, मुस्लीम आणि दलित मतांचे विभाजन करण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले. मतदानाचा वाढलेला टक्का पाहता, चुरशीच्या या लढतीत जातीय ध्रुवीकरणाच्या पलीकडे मतदार आपल्याकडे खेचण्यात ज्या उमेदवाराला यश मिळेल त्याच्याबाजूने लोकसभेचा निकाल लागलेला असेल.

दोन शिवसेनांमधील थेट लढत

दोन्ही शिवसेनांमध्ये मराठवाड्यात दोन मतदारसंघांमध्ये थेट लढत झाली. त्यापैकी पहिला छत्रपती संभाजीनगर. येथे एमआयएमचे विद्यामान खासदार इम्तियाज जलील हे यावेळीही रिंगणात आहेतच. पण दोन्ही शिवसेना या मतदारसंघात आमने-सामने उभ्या राहिल्या, हे यावेळचे वेगळेपण. शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री संदिपान भुमरे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना येथे उमेदवारी देण्यात आली. मुस्लीम, दलित, मराठा आणि ओबीसी मतदार येथे निर्णायक संख्येत आहेत. अन्यत्र प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहताना दिसलेला मुस्लीम मतदार येथे मात्र प्रामुख्याने एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडे वळलेला दिसला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ वगळता मुस्लीम मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसला. ही निवडणूक दोन्ही शिवसेनांमधील थेट लढतीमुळे उमेदवार केंद्रित झाली. खैरे विरुद्ध भुमरे असाच सामना प्रामुख्याने येथे दिसला. त्यामुळे मराठा आणि ओबीसी मतदार या दोन्ही उमेदवारांमध्ये विभागला गेल्याचे दिसले. दलित मतदारांचा कल प्रामुख्याने खैरे यांच्या बाजूने दिसला. मतदारसंघात भाजपचा प्रभाव असलेल्या गंगापूर आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव असणाऱ्या वैजापूर या दोन ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघांचा कल निर्णायक ठरेल.

दोन्ही शिवसेनांमध्ये थेट लढत झालेला दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगोली. येथे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून ऐनवेळी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाने नागेश पाटील-आष्टीकर यांना रिंगणात उतरवले. शेतकरी मतदारांची सत्ताधाऱ्यांविरोधात असलेली नाराजी आणि मराठा मतदारांचे झालेले ध्रुवीकरण यामुळे नागेश पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळाला. मुस्लीम मतदारांचा कलही पाटील यांच्याकडेच दिसून आला. या मतदारसंघात बंजारा समाजही लक्षणीय संख्येत आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले डॉ. बी. डी. चव्हाण यांच्यामुळे बंजारा आणि दलित मतांचे विभाजन झालेले पाहायला मिळाले. ओबीसी मतदार मात्र प्रामुख्याने शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांच्याकडे वळलेला दिसून आला. वरकरणी तिरंगी वाटणाऱ्या या लढतीत प्रामुख्याने मतदार बाबुराव कदम आणि नागेश पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये विभागलेला दिसून आला.

भाजप विरुद्ध काँग्रेस

मराठवाड्यात जालन्याप्रमाणे काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झालेले मतदारसंघ म्हणजे लातूर आणि नांदेड. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे नांदेड मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले. नांदेडमध्ये भाजपने विद्यामान खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना रिंगणात उतरवले. तर लातूरमध्ये भाजपकडून विद्यामान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी अखेरपर्यंत दिसत राहिली. परंतु लिंगायत, बंजारा, वंजारी, धनगर आणि माळी समाजातील मतदारांचा कल भाजपच्या बाजूने राहिला. अशोक चव्हाण यांचे निवडणूक व्यवस्थापन आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या सभा यांचा फायदा नांदेडमध्ये भाजपला होऊ शकतो. नांदेडमध्ये मुस्लीम मतदारांचा पाठिंबा काँग्रेसला मिळताना दिसला, तरी दलित मतदार वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात विभागला गेल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये मराठा समाजाचा कल निर्णायक ठरताना दिसत आहे. तर लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांनी प्रामुख्याने लिंगायत मतपेढी बांधण्याचा प्रयत्न केला असला; तरी माजी मंत्री शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील-चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनाही लिंगायत समाजातून पाठिंबा मिळताना दिसला. लातूर ग्रामीण, लातूर शहर, लोहा या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे डॉ. काळगे यांच्या बाजूने प्रामुख्याने कल दिसून आला. तर निलंगा, उदगीर, अहमदपूर या मतदारसंघांमध्ये महायुतीचे संघटनात्मक बळ भाजपच्या सुधाकर शृंगारे यांच्यासाठी जमेची बाब ठरली. नांदेड आणि लातूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये सुरुवातीला भाजपसाठी अनुकूल झालेली निवडणूक पुढे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारांनी ताकदीने लढत कमालीची चुरशीची केल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात यावेळी भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी अशा राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक येथे राजकीय पक्षांची दमछाक घडवणारी जशी राहिली, तशीच मतदारांनाही त्यांच्या धारणांचा विचार करायला लावणारी ठरली. त्यातून काय कौल मराठवाड्याची जनता देते, हे पाहायचे.

ठाकरेंबरोबर राहिलेले दोन खासदार

शिवसेना ठाकरे गटाने मराठवाड्यात निवडणूक लढवलेले आणखी दोन मतदारसंघ म्हणजे धाराशिव आणि परभणी. या दोन्ही मतदारसंघांतील विद्यामान खासदार पक्षफुटीनंतरही ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांनाच, म्हणजे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, तर परभणीमध्ये संजय जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. महायुतीकडून मात्र या दोन्ही मतदारसंघांत सुरुवातीला उमेदवारीवरून बराच संभ्रम राहिला. अखेर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश घडवून त्यांना धाराशिवमध्ये उमेदवारी देण्यात आली. ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, आघाडीतील मित्रपक्षांची कमालीची मदत आणि मुस्लीम व दलित मतदारांचे धृवीकरण यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवारापुढे कडवे आव्हान निर्माण केले. मात्र, महायुतीतील घटक पक्षांचा प्रभाव असणाऱ्या औसा, तुळजापूर, बार्शी आणि परांडा या मतदारसंघांतील मतदारांचा कल येथे निर्णायक राहील. तर परभणीमध्ये ठाकरे गटाच्या संजय जाधवांविरोधात महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना उमेदवारी दिली. येथे नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेनंतर महादेव जानकरांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर जानकरांच्या बाजूने ओबीसी मतदारांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याचे दिसले. परंतु त्याचवेळी मुस्लीम व मराठा मतदारांचा वाढता पाठिंबा आणि आघाडीतील घटक पक्षांची मिळालेली रसद याचा फायदा संजय जाधव यांना झालेला दिसून आला. येथे वरकरणी ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार’ अशी प्रचाराची दिशा राहूनही विविध समाजघटकांतील मतदारांचे निर्णायक ध्रुवीकरण आणि दोन्ही उमेदवारांना त्यांच्या घटक पक्षांची मिळालेली मदत हे मुद्दे प्रभावी ठरतील, असे चित्र आहे.