रत्नागिरी: मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या  चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता, ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने विना पावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इको हे वाहन मुंबईहून रत्नागिरीकडे  येत होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वेक्षण पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावर तपासणी करताना, या इको वाहनात ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने मिळून आले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते सर्वेक्षण (एसएसटी)  पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व एसएसटी आणि एफएसटी पथकांना विविध तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदार संघात एसएसटी, एफएसटी पथकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The survey team of the administration seized gold worth 35 lakhs in ratnagiri amy