आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, “हिंदूंमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मेट्रो, बेस्टच्या कार्यक्रमात करोना दिसत नाही का? ” अशी भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नितेश राणे म्हणाले, “मेट्रोच्या कार्यक्रमात गर्दी दिसत नाही, काल बेस्टचा कार्यक्रम झाला तिथे स्वतः मुख्यमंत्री होते तिथे यांना गर्दी दिसत नाही. यांच्या पार्ट्या चालतात तिथे या लोकांना करोना दिसत नाही. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन झालं तिथे यांनी गर्दी दिसत नाही. पण जिथे जिथे आमचे सण आले त्यावेळी यांना करोना दिसतो. मुंबईमध्येही अशीच अवस्था केलेली आहे.”
तसेच, “राज्यपालांशी आम्ही बोललो की, सणांच्या निमित्त जे होर्डिंग्ज लागतात ज्यावर या सगळ्या गणेशोत्सवांतील आर्थिक सगळी गणितं बांधेलेली असतात, आता त्या होर्डिंग्जवर देखील बंदी घातलेली आहे. म्हणजे होर्डिंग लावल्यावर कुठला करोना पसरतो आणि या लोकांना कुठल्या कंपाउंडरने ते सांगितलेलं आहे? याचं तरी उत्तर ठाकरे या सरकारने आम्हाला दिलं पाहिजे. छोट्या आरत्या पण बंद करायचं या लोकांना आता सांगितलेलं आहे. मुंबईची तीच अवस्था कोकणात नेमकं आम्ही पोहचायचं कसं याचे देखील जीआर त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. म्हणून अशी एकंदरीत परिस्थिती, म्हणजे हिंदू धर्मावर कुठल्या पद्धतीने सगळं संकट आणायचं.” असंही यावेळी नितेश राणेंनी म्हटलं.

“सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?” भाजपा आमदार नितेश राणेंचा खोचक सवाल!

याचबरोबर, “मी काही दिवसांअगोदर ट्विट केलं की हिंदू खतरे मे है, अशी परिस्थिती जशी पश्चिम बंगालमध्ये होती. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात, मुंबईत घडवण्याचं काम हे ठाकरे सरकारने सुरू ठेवलं आहे. ही सगळी परिस्थिती आम्ही राज्यपालांच्या कानावर घातलेली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं करा आणि मला जे करायचं मी करेन कारण ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे. आज हिंदू सण, हिंदू संस्कृती आणि आज हिंदूंमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. काही महिन्याअगोदर अन्य धर्मांचे देखील सण झाले, तेव्हा असे काही शिष्टमंडळ राज्यपालांना किंवा मुख्यमंत्र्यांना भेटताना आम्हाला तरी दिसलेलं नाही.” असंही भाजपा आमदार नितेश राणे यांनी याप्रसंगी बोलून दाखवलं.

मुंबईत राहणारा ‘हिंदू खतरे में है’; नितेश राणेंचं ट्वीट, ठाकरे सरकारवर निशाणा

“हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी या अगोदर केलेली आहे.