फलटण ते लोणंद मार्गे पुण्याकडे जाणा-या डेमू ट्रेनला विशेष कार्यक्रमात दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून पर्यावरण, वन व हवामान व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रकाश जावडेकर यांनी रवाना केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यावेळी पालकमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, गिरीश बापट, श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, चंद्रकांत (दादा) पाटील, सुनील कांबळे, नगराध्यक्षा नीता नेवासे यावेळी सहभागी झाले होते. तर, रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा, सदस्य परीचालन व व्यवसाय विकास पुनेंदू मिश्रा नवी दिल्लीहून व्हिडिओद्वारे सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी स्वागत केले.
आज केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. पियुष गोयल जी आणि केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर जी यांनी फलटण-पुणे व्हाया लोणंद डेमू रेल्वे सेवेचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला. pic.twitter.com/2k9Ln2uHDL
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 30, 2021
प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले, रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये व्यापक बदल दिसतात. बायो-टॉयलेट्सच्या परिचयामुळे ट्रॅक आणि स्टेशन प्लॅटफॉर्म स्वच्छ झाले आहेत. स्वच्छ भारत यांचे हे एक आदर्श उदाहरण आहे. आयआरसीटीसीवरील आरक्षणामुळे प्रवाशांना तिकीट जलद मिळण्यास मदत झाली असेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च मानकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित रेल्वेमार्ग क्रॉसिंगचे उच्चाटन, विद्युतीकरणाची प्रगती, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, रेल्वेची बंदर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधांमुळे अर्थव्यवस्था व विकासाला चालना मिळाली आहे. पाच हजाराहून अधिक रेल्वे स्थानकांत वाय-फाय प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वर्ल्ड वाईड वेबवर जाता येईल आणि त्यांचे ज्ञानाचे क्षितिज उघडले जाईल.
श्री प्रकाश जावडेकर, पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार यांनी दि. ३०.३.२०२१ रोजी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फलटण ते लोणंदमार्गे पुणे या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. pic.twitter.com/wfCybk6NIr
— Central Railway (@Central_Railway) March 30, 2021
फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतक-यांना नवीन बाजारपेठेत पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल. रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे आणि पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे.यामुळे फलटणमधील रहिवाशांना फलटण ते पुणे आणि परत अशी थेट प्रवासी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल असेही जावडेकर यांनी सांगितले.