देशपातळीवर वैद्यकीय शिक्षणात महत्वाचे स्थान असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी अर्थात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ अशा नामकरणास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिल्याचे कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Petrol-Diesel Price on 7 January 2023: पेट्रोल डिझेल दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

डॉ. भोसले म्हणाले, की कृष्णाकाठच्या सामाजिक सुधारणांचे प्रणेते जयवंतराव भोसले यांनी सर्वसामान्य ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण, आरोग्यसेवा मिळावी म्हणून कराडमध्ये १९८४ साली कृष्णा विश्वस्त न्यासाच्या माध्यमातून ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स’ संस्थेची स्थापना केली. आरोग्य विज्ञानात झपाट्याने होत जाणारे बदल लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सन २००५ मध्ये या शिक्षण संस्थेला ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड युनिव्हर्सिटी’ म्हणजेच अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.
कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अगदी सुरुवातीपासून उत्तुंग कामगिरी साधली. जवळपास ५८ एकरच्या विस्तीर्ण परिसरात विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणासह नर्सिंग, दंतविज्ञान, फिजिओथेरपी, अलाईड सायन्स व फार्मसी अशा विद्याशाखा सुरु करत, विविध अभ्यासक्रम सुरु केले. या विद्यापीठात हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे डॉ. भोसले म्हणाले.

हेही वाचा- VIDEO : मुंबईतील जुहू चौपाटीवर आदित्य ठाकरेंकडून ड्रम वादन; नेटकरी म्हणाले, “भाजपा अन् शिंदे गटाचा…”

कृष्णा विद्यापीठाला गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन, एकाच छताखाली मिळणाऱ्या उच्च शैक्षणिक सुविधा, बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल यापूर्वीच ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन आणि ‘आयएसओ ९००१:२०१५’ मानांकनही मिळाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अलीकडेच जाहीर केलेल्या राष्ट्रीयस्तरावरील सर्वोत्कृष्ट शंभर विद्यापीठात कृष्णा विद्यापीठ ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था श्रेणीमध्ये कृष्णा वैद्यकीय विद्यापीठ ४२ व्या स्थानावर आहे.

हेही वाचा- मुंबई, पुण्याची हवा बिघडली; पुढील दोन दिवस मुंबईत अतिधोकादायक, तर पुण्यातील हवा धोकादायक पातळीवर

झपाट्याने बदलणारे शिक्षणक्षेत्र, वाढत्या शैक्षणिक गरजा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यापीठाचे नाव ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ करण्याचा निर्णय घेतला. त्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालायाचीही मंजुरी मिळाली. आता कृष्णा विद्यापीठाचा कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, फाईन आर्टस्‌सह अन्य शैक्षणिक तसेच संशोधनपर अभ्यासक्रमही सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The union ministry of education approved the naming of krishna medical science abhimat university as krishna vishwa university karad dpj