महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. याबाबत विविध कयास लावले जात आहेत. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे या निकालाचं वाचन करणार आहेत. अशात शिंदे गटाकडून हा दावा केला जातो आहे की योग्य निकाल लागेल. तर ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून हे सांगितलं जातं आहे की सरकार कोसळेल कारण १६ आमदार अपात्र ठरतील. याबाबत आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे चंद्रकांत खैरेंनी?
निकाल गद्दारांना धडा शिकवणारा असणार आहे. कारण त्यांनी केलेली गद्दारी ही कुणालाच मान्य नाही. जनतेलाही मान्य नाही. आम्ही सगळे उद्धव ठाकरेंसोबत उभे आहोत. एकनिष्ठ शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवणारा आजचा निर्णय असणार आहे. मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देवभक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे अशी प्रार्थनाही मी देवाकडे केली आहे असंही चंद्रकांत खैरेंनी सांगितलं.
उदय सामंत उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
उदय सामंत हे स्वतः उद्धव ठाकरे साहेब यांच्या संपर्कात आहेत कारण की शिंदे गटातील सर्वात शेवटी गेले आहेत त्यामुळे ते १६ मध्ये आले नाही यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. यांच्या गटातील अनेक जण आता फुटणार आहेत त्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल त्यावरून तेच होईल मात्र काही असो उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल असा विश्वास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.