गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. आदिवासी समाजातील दोन गट आमने-सामने आल्याने मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून धुमसतंय. परंतु, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत अद्यापही भाष्य केलेलं नाही. दोन महिन्यांनंतरही मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यास केंद्र सरकारला यश आलेले नाही. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मणिपूर आमच्या देशाचा हिस्सा आहे. मणिपूरमधील हिंसा रोखण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. मणिपूर जर बिगर भाजपाशासित राज्य असतं तर अमित शाह, स्मृती इराणी, नरेंद्र मोदी यांची भाषा बदलली असती. तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती, सरकार बरखास्त केलं असतं. पण मोदींनी मणिपूर हिंसाचारप्रकरणी अद्यापही आपल्या मन की बात देशासमोर ठेवलेली नाही. यावर संसदेत चर्चा होणार असेल तर यात चुकीचं काय? पूर्ण विश्वाला चिंता आहे, पण विश्वगुरूला चिंता नाही. राहुल गांधी यांनी साडेचार हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा केली आहे. त्यांना लोकांचं समर्थन आहे. देशात अशी हिंचा सुरू असेल तर, लोकांना मारलं जात असले, लोक बेघर होत असतील तर त्यावर देशाचा नेता चिंता व्यक्त करत असेल तर चुकीचं काय?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> “सरकार म्हणजे विषकन्येसारखं, ज्या प्रकल्पात हस्तक्षेप…”; नितीन गडकरींचं मोठं विधान

प्रमुख पक्षांच्या बैठकीत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

१७ आणि १८ जुलै रोजी देशातील सर्व विरोधी पक्षनेते पुन्हा एकदा एकत्र आहेत. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” १७ तारखेला सायंकाळी बैठक सुरू होईल. सोनिया गांधी यांनी डिनरचंही आयोजन केलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ११ वाजता बैठक सुरू होईल.यावेळची बैठक निर्णायक होणार आहे. अनेक गोष्टी यात ठरवल्या जातील. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मी जाणार आहे. एनसीपीचे प्रमुख शरद पवारही या बैठकीत सहभागी होतील. काँग्रेसने या बैठकीचं आयोजन केलं आहे. बैठक महत्त्वपूर्ण आहे. जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

…तर नोटिशीला उत्तर देईन

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाबाबत संजय राऊतांनी मोठा दावा केला होता. मंत्र्यांना वाचवण्याकरता मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं होतं. यावरून संजय राऊतांना नोटीस आल्याचं म्हटलं जातंय. यावरून संजय राऊत म्हणाले की, “अशी कोणतीच नोटीस मला अद्यापही आलेली नाही. अशी नोटीस आली तर मी नक्कीच उत्तर देईन. सध्याचं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे. माझ्या जे म्हणतोय त्याला आधार आहे. ज्यांच्यावर गुन्हे आहेत, ते तुमचे सहकारी आहेत. मी जे बोलतोय त्यात तथ्य आहे. राहुल कूल, विखे पाटील झाकीर नाईककडून घेतलेला फंड, दादा भुसे, अब्दुल सत्तार हे गुन्हेगार नाहीत का? यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयतून फोन जात नाहीत का? आधी त्यांना नोटाीसा पाठवा, त्यांना चौकशीसाठी बोलवा, मग बघतो मी”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The whole world is worried but vishwaguru sanjay rauts attack on the prime minister sgk