कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या करपडी येथील शाळेमध्ये चोरी होण्याची घटना घडली. मात्र या प्रकरणी कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल न करता शाळा व्यवस्थापन व शिक्षण विभाग यांची आळीमिळी गुपचिळी… हे कशासाठी सुरू आहे याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपडी या शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने शाळेच्या खिडकीमधून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शालेय पोषण आहारातील गोडेतेल बिस्कीट पुढे चोरून नेले. ही चोरी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर त्या ठिकाणच्या शिक्षकांनी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार न देता हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीला सांगितला. यानंतर दहा तारखेला शाळा व्यवस्थापन समितीची पालक सभा झाली यावेळी सर्व पालकांनी यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी अशी मागणी केली. यानंतर वीस तारखेला शाळेकडून शिक्षण विभागाला घडलेल्या घटनेची माहिती देणार पत्र देण्यात आले व या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी मार्गदर्शन व परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर शिक्षण विभागाने काही दिवसांनी शाळेला पत्र देऊन याबाबत शाळा व्यवस्थापन समितीची चर्चा करून निर्णय घ्यावा असे कळवले .. यामध्ये बराच कालावधी गेला यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी राशीन पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या घटनेबद्दल केवळ माहिती अर्ज दिलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबाबत विचारणा केली असता आम्ही केवळ आपणास माहितीसाठी अर्ज दिला आहे असे शाळेकडून त्यांना सांगण्यात आले. यामुळे पोलीस स्टेशनच्या दप्तरी केवळ चोरी झालेल्या घटनेचा अर्ज आलेला आहे अशा पद्धतीने या चोरीचा प्रवास आज पावतो झालेला आहे.

यामुळे या घटनेनंतर चोर राजरोसपणे चोरी करून त्या ठिकाणी फिरत आहे. आणि पुन्हा शाळेमध्ये चोरी केली तरी काहीच होत नाही हे बहुदा आता चोरट्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांचे चांगलेच धाडस वाढवून पुन्हा त्या शाळेमध्ये मोठी चोरी झाली तरी आश्चर्य वाटायला नको…

बाळासाहेब मुळीक पोलीस उपनिरीक्षक

करपडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या चोरीच्या संदर्भात शिक्षक आणि स्थानिक व्यक्तींनी राशीन पोलीस स्टेशनमध्ये केवळ अर्ज दिलेला आहे. त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. चोरीची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो.