अजित पवार गटाचे नेते आणि अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं. त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळांच्या या भूमिकेनंतर मराठा समाजातून त्यांना प्रचंड विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून पाठिंबा मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, गुरुवारी (३० नोव्हेंबर) छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना मराठा समुदायाकडून त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. मराठा आरक्षण समर्थकांनी भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा देण्यात आला. या संपूर्ण घडामोडींवर प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळांचं नेतृत्व अतिशय चांगलं आणि दमदार आहे. ते भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात, असं सूचक वक्तव्य आमदार कडू यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “२००४ ला भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी…”, वाजपेयी-महाजनांचा दाखला देत प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

येवल्यात छगन भुजबळांना झालेल्या विरोधाबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “छगन भुजबळांचं नेतृत्व अतिशय चांगलं आणि दमदार आहे. फक्त त्यांचा पवित्रा थोडासा चुकला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचं आणि मराठ्यांसह ओबीसींचं, एससी, एसटींचं नेतृत्व करावं. मराठा आणि ओबीसी हे खानदानी शत्रू नाहीयेत. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर ते दमदार नेतृत्व आहे. अतिशय मजबूत नेतृत्व आहे. त्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली तर ते भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then chhagan bhujbal will become chief minister bachchu kadu statement rmm
Show comments