सेवाग्राम आश्रमातून महात्मा गांधी यांच्या चष्माच्या चोरी प्रकरणी योग्य तपास सुरू असून प्रसंगी आरोपीची नार्को टेस्ट केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रविवारी सेवाग्राम येथे दिली.
दोन वर्षांंपूर्वी सेवाग्राम आश्रमातून महात्मा गांधींचा चष्मा चोरीस गेला होता. त्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असतांनाच स्थानिक गुन्हा शाखेनेआरोपी कुणाल वैद्य याला नुकतेच पकडले.
या पाश्र्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रविवारी सेवाग्राम आश्रम परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी आश्रमातील वस्तूंची पाहणी केली. काही कपाटांची कुलपे तपासून, आता तरी व्यवस्थित आहे ना, अशी विचारणा त्यांनी आश्रम संचालकांकडे केली.
‘..तर आरोपीची नार्को टेस्ट करू’
सेवाग्राम आश्रमातून महात्मा गांधी यांच्या चष्माच्या चोरी प्रकरणी योग्य तपास सुरू असून प्रसंगी आरोपीची नार्को टेस्ट केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री
First published on: 09-12-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then conduct narco test of accused