Sanjay Raut on Badlapur Encounter Case: बदलापूर लैंगिक अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्यानंतर सरकारमधील लोक स्वतःला सिंघम समजू लागले आहेत. सिंघम काल्पनिक कथानकावरील चित्रपट होता. मी सिंघम की तू सिंघम अशी स्पर्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये सुरू आहे. उच्च न्यायालयाने काल बदलापूर चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा द्यायलाच हवी. जलदगती न्यायालयात हे खटले न रखडता लवकर न्याय मिळायला हवा. पण केवळ राजकीय स्वार्थासाठी एका आरोपीला अशाप्रकारे संपवले जात असेल तर ते चुकीचे आहे.

भाजपा पदाधिकाऱ्याचाही एन्काऊंटर करणार का?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सिंघम कोण यावरून भांडणे सुरू आहेत. एका सरकारमधील दोन नेते चकमकीचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ करताना आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. यावरूनच यामागे किती राजकारण शिजत आहे, हे दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात १०० हून अधिक महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अनेक गुन्हे घडले आहेत. तिथे किती लोकांचा एन्काऊंटर करण्यात आला? मुंबईतील नालासोपारा येथील भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सिंघम फडणवीस, सिंघम एकनाथ शिंदे त्याचा एन्काऊंटर करणार का? एकच एन्काऊंटर का? ज्यांनी ज्यांनी महिलांवर अत्याचार केला, त्यांचा त्यांचा एन्काऊंटर केला तर आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ”, असे आव्हान संजय राऊत यांनी केले.

Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
Neelam gorhe statement about ram shinde in Legislative Council hall is viral
नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”
Image Of Ram Shinde And Ajit Pawar.
Ajit Pawar : “आपण हरलात ते योग्य झालं”, राम शिंदेंचे अभिनंदन करताना अजित पवारांची टोलेबाजी
Deputy Chief Minister Eknath Shinde visited Smriti Mandir premises and talk about RSS
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
Sanjay Shirsat Eknath Shinde
“आम्हाला मध्येच डच्चू मिळू शकतो”, संजय शिरसाटांनी सांगितला एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिलेला संदेश
Reshma Shinde Husband job and profession
रेश्मा शिंदेचा पती पवन काय काम करतो? अभिनेत्रीसाठी घेतलाय भारतात परतण्याचा निर्णय; म्हणाली, “युकेमध्ये तो…”

भाजपाचा पदाधिकारी सामूहिक बलात्कार प्रकरणात सापडल्यानंतर भाजपाने काय केले. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक असलेले फोटो आम्ही पोस्टरवर पाहिले. सिंघम स्वतः जाऊन गुन्हेगारांना गोळ्या घालतो. तो खाकी वर्दीतील पोलिसांकडून गोळ्या चालवत नाही. नालासोपारा प्रकरणातील आरोपीला कधी गोळ्या घालणार? समान न्यायाच्या नियमानुसार त्यालाही गोळ्या घातल्या पाहीजेत आम्ही त्याचे समर्थन करू, असेही संजय राऊत म्हणाले.

कसला बदला पूर्ण झाला?

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून संस्थाचालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला. संस्था चालकांच्या विरोधात कुणीतरी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून तिथे मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफी सारखे गुन्हे घडत होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. उच्च न्यायालय या याचिकेवर निर्णय घेईल. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला गोळ्या घालून तुम्ही पुरावा नष्ट करण्याचे काम केले आहे. कारण या लैंगिक अत्याचाराचा सूत्रधार गंभीर गुन्ह्यात सामील असून त्यांना वाचविण्याचा आरोप होत आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

Story img Loader