तासगावमधून प्रचंड मतांनी विजयी झालो, तर खासदारकी सोडावी लागेल आणि जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडेन, या शब्दांत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी भाजपचे सांगलीतील खासदार संजयकाका पाटील यांना आव्हान दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यासाठी आर. आर. पाटील सांगलीमध्ये आले होते. मेळाव्यात बोलताना त्यांनी संजयकाका पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, तासगाव विधानसभेसाठी मला आव्हान देणाऱयांनी पुढे यावे. मीही मैदानात असणारच आहे. प्रचंड मतांनी विजयी झालो, तर खासदारकी सोडावी लागेल आणि जर मी पराभूत झालो, तर राजकारण सोडेन.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनीही या मेळाव्यात शिवसेना-भाजपवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा