मराठा समाजातील गरिबांची आरक्षणामुळे प्रगती होणार असेल तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आरक्षणाला पाठिंबा राहील, असे मत ब्राह्मण महासंघाचे कुलगुरू पं. वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
मराठा समाजातील गरिबांची या आरक्षणामुळे प्रगती होणार असेल तर ब्राह्मण महासंघाचा ‘मराठा आरक्षणाला’ पूर्ण पाठिंबा राहील, अशा शब्दात गाडगीळ यांनी मराठा आरक्षणाबद्दल महासंघाची भूमिका स्पष्ट केली. ‘ओबीसी समाज हिंदू धर्माचा त्याग करणार असल्याच्या’ बातमीबाबत ते म्हणाले की, हिंदू कोणालाही कुठल्याही धर्मात जाण्याची मुभा आहे, पण हिंदू धर्मात अशाप्रकारचे वर्णवर्चस्ववाद कुठे आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर वापरलेल्या परशूच्या चित्रावरून निर्माण झालेले वाद हे केवळ अज्ञानातून निर्माण झाले आहे आणि साहित्याच्या उपासकांनी जातीय वादातून शारदेला मलीन करू नये, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले.
..तर मराठा आरक्षणाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा!
मराठा समाजातील गरिबांची आरक्षणामुळे प्रगती होणार असेल तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आरक्षणाला पाठिंबा राहील, असे मत ब्राह्मण महासंघाचे कुलगुरू पं. वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले. मराठा समाजातील गरिबांची या आरक्षणामुळे प्रगती होणार असेल तर ब्राह्मण महासंघाचा ‘मराठा आरक्षणाला’ पूर्ण पाठिंबा राहील, अशा शब्दात गाडगीळ यांनी मराठा आरक्षणाबद्दल महासंघाची भूमिका स्पष्ट केली. ‘ओबीसी समाज हिंदू धर्माचा त्याग करणार असल्याच्या’ बातमीबाबत ते म्हणाले की, हिंदू कोणालाही कुठल्याही धर्मात जाण्याची मुभा आहे, पण हिंदू धर्मात अशाप्रकारचे वर्णवर्चस्ववाद कुठे आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-01-2013 at 04:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then support from bramhan mahasangha to maratha reservation