मराठा आरक्षणासाठी महिनाभर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज येवला येथे जाहीर सभा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमने सामने आले आहेत. त्यातच, त्यांच्या मतदारसंघात आज जरांगे पाटील आज जाहीर सभा घेणार असल्याने सर्वांचं या सभेकडे लक्ष आहे. दरम्यान, छगन भुजबळांनी आज मनोज जरांगे पाटलांविषयी वक्तव्य केलं आहे. जरांगे पाटील बोलत असतील तर त्यांना आपण थांबवणार कसं? असा सवाल त्यांनी आज उपस्थित केला. ते आज माध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळांना मराठा समाजाने मोठं केलं, मराठा समाजाने भुजबळांना मदत केली, मराठा समाजाकडून भुजबळांना मतदान करण्यात येतं, आणि आता भुजबळांना मराठा आरक्षण नकोय. ते मराठा आरक्षणाविरोधात उभे ठाकले आहेत. परंतु, मराठा आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केल्यापासून जरांगे पाटलांनी भुजबळांना लक्ष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या वक्तव्याला छगन भुजबळांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
What Suresh Dhas Said ?
Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका
sanjay raut
Sanjay Raut : “संतोष देशमुखप्रकरणी सुरेश धस पुरेसे, फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय…”, संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत!

ते म्हणाले की, लोकांना आपलंसं करण्यासाठी अनेक गोष्टी बोलाव्या लागतात. त्या गोष्टी जरांगे पाटील बोलत असतील तर त्यांना आपण थांबवणार कसं? परंतु, जनता निर्णय घेईलच. इतरांनी मला जशी मदत केली, तशी इतरांनाही माझी मदत झालीच असेल. मी सुद्धा काहीतरी सहकार्य करत असेन म्हणून तर लोक मला मदत करतात. सगळ्यांनाच लोक मदत करत नाहीत. तरीही त्यांचं म्हणणं असेल तर जनता काय तो निर्णय घेईलच.

दरम्यान, १४ तारखेला जालन्यात भव्य सभा होणार आहे. या सभेबाबत छगन भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले की, “सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. सर्वजण आपआपलं म्हणणं मांडण्याकरता सभा घेत असतात. तो त्यांचा अधिकार आहे.”

सारथी, बार्टी, महाज्योतीला ठरलेला निधी मिळणार

सारथी, बार्टी, महाज्योती कबुल केलेले पैसे मिळणार आहेत. पैसे एकदम मिळत नाहीत. पुढेही काही अडचणी असतात. परंतु, शासनानाकडून ठरल्याप्रमाणे पैसे मिळतात.

मनोज जरांगे पाटलांची आज येवल्यात सभा

आज येवला येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर होणार सभा आहे. भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची सभा होणार आहे. या सभेसाठी ते येवल्यात दाखल झाले असून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. दरम्यान, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून वाद असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज छगन भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

छगन भुजबळांविरोधात याचिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. छगन भुजबळांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी कधी होणार? अशी विचारणा करणारी याचिका दमानिया यांनी दाखल केली आहे. दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतल्याने छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

Story img Loader