महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांनी समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या रिल्स-स्टार्सशी संवाद साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून १ ऑगस्ट रोजी ‘रीलची शान नवनिर्माणाचा सन्मान, महाराष्ट्र नवनिर्माण Reel Baaz पुरस्कारा’चे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्रातील अनेक सुप्रिद्ध मराठी रील्स-स्टार्स या कार्यक्रमाला हजर राहिले होते. या रील्स-स्टार्सना राज ठाकरेंनी संबोधित करत त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा >> “तू कार्यक्रमाला ये, दोन मिनिटं बोल आणि निघ”, अमित ठाकरेंनी राज ठाकरेंनाच दिला सल्ला, नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Balasaheb Thackeray grandson Aaishvary to debut in Bollywood
बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर मिळाला पहिलाच प्रोजेक्ट
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Uddhav Thackeray should introspect says Chandrashekhar Bawankule
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे! बावनकुळे म्हणाले…

“आपल्या देशात अनेक वर्षे गायक, संगीतकार, लेखक, कवी, कलाकार झाले. सिनेमा, नाट्यक्षेत्र, गायन, शास्त्रीय संगीत या विविध अंगांमध्ये आज तुम्हीही (रील्स-स्टार) येता. ज्यामध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. जो समाज आपली सुख-दुःख सर्व गोष्टी विसरतो आणि तुमच्यामध्ये रममाण होतो, ही ताकद किती मोठी असेल. या सर्वच क्षेत्रातील कलावंतांचे या देशावर खूप मोठे ऋण आहेत. याचं कारण तुम्ही नसता तर या देशात कधीच अराजक माजलं असतं. तुमच्यामुळे समाज वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करतो”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी रील्सस्टार्सचं कौतुक केलं.

“आजची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता, कोण कुठे आहे? याचा काही पत्ताच लागत नाही. कोण कुठल्या पक्षात गेलाय, काहीच कळत नाही? या सर्व गोष्टींकडे केवळ तुमच्यामुळे दुर्लक्ष होतंय. आज समाज शांत बसलाय, आनंदी आहे, यामध्ये सर्वात मोठं श्रेय तुमचं आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत तुमच्या रील्सच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. या गोष्टी तुम्ही उत्तम रितीने करू शकाल, अशी मला १०० टक्के खात्री आहे. तुम्ही महाराष्ट्रांच्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष द्यावं आणि ते तुमच्या विनोदाच्या रुपाने लोकांच्या समोर यावेत, एवढीच मला अपेक्षा आहे,” असंही राज ठाकरे म्हणाले.

Story img Loader