“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे”, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावरून राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले आहे. आता शिवसेना नेते किरण पावसकर यांनी या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवरही टीका केली आहे.
“उद्धव ठाकरे म्हणतात की मी हिंदुत्वापासून दूर गेलो नाही, मग ते राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना अशी हिंदुत्वविरोधी वक्तव्ये करण्यापासून रोखतील का? नाही तर त्यांनी हिंदुत्व सोडले नाही हे नाटक बंद करावे. ते जर असं सांगू शकत नसतील ते कुत्र्याला भुंकायला सांगू शकतात”, अशा कठोर शब्दांत किरण पावसकर यांनी टीका केली आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड शुक्रवारी पक्षाच्या शिबिरात म्हणाले.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोकळा श्वास आणि मन मोकळं करायचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जर कोणी काही वक्तव्य केलं असेल तर त्यावर लगेच गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. सर्वच राजनेत्यांनी ही पद्धत थांबवली पाहिजे. कोणीही काहीही बोललं असेल तर लगेच केस न करता आपण सर्वांनी मिळून तारतम्य बाळगलं पाहिजे, लगेच केस करणं यावर विचार केला पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.