आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीतील अनेक घटकपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा चालू झाली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध NDA अशी ही लढत असणार आहे. युती आणि आघाडीत जवळपास प्रत्येकी २०-२५ मित्रपक्ष आहेत. त्यामुळे या सर्व मित्रपक्षांमध्ये जागा वाटप करणं आव्हानात्मक ठरणार आहे. तसंच, एनडीएतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षानेही आता एका जागेची मागणी केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रामदास आठवले म्हणाले, सरकारला सूचना करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. मात्र मोदी हटावची मोहिम इंडिया आघाडीने आखली आहे. परंतु, मोदींना हटवणं येरागबाळ्याचं काम नाही. १९९२ मध्ये भाजपाचे दोनच खासदार होते, परंतु आता २०२४ मध्ये ३७० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. तर एनडीएचे ४०० पेक्षा जास्त सदस्य निवडून येतील.

हेही वाचा >> “अन् बाळासाहेबांचा राजा ढसाढसा रडला”, काका-पुतण्याच्या नात्यावरून मनसेची खास पोस्ट!

मी लोकसभेचा माणूस

“लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे, की मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही मी लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणं आवश्यक आहे”, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली.

दलित मतांसाठी आम्हाला जागा द्यावी

“देशभरातील लोक मला विचारत आहेत. आरपीआयला शिर्डीतून एक जागा द्यावी. येथून आरपीआयचा उमेदवार जिंकून यावा अशी देशभरातील लोकांची मागणी आहे. शिर्डीतील लोकांचीही ही भावना आहे. मी तिथून निवडून आलो तर मोदींच्या मंत्रिमंडळात मला नक्कीच संधी मिळेल. त्या मंत्रिपदाचा मी उपयोग करेन. शिर्डी लोकसभेचा कायापालट करेन, न्याय देण्याचं काम मी मंत्रिपदाच्या माध्यमातून करू शकेन. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विनंती आहे की, लोकांच्या भावनांचा आदर राखणं गरजेचं आहे. आम्हाला एकतरी जागा मिळावी. आम्हाला एकही जागा मिळाली नाहीतर आम्हाला तोंड दाखवणं अवघड होऊन जाईल. दलित मतं ट्रान्सफर करायची असतील तर आरपीआयला जागा द्यावी”, अशी साद रामदास आठवलेंनी घातली आहे.