नोटबंदीचा निर्णय जसा बालिशपणे घेण्यात आला तसाच दोन हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपावर टीकेची तोफ डागली आहे. देशात वातावरण बदलू लागलं आहे हे आपण कर्नाटकमध्ये पाहिलं आहे. येत्या काळात काँग्रेससाठी आशादायी चित्र असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच मोदी सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सोलापूरमध्ये पृथ्वीराज चव्हाण बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
“देशात बदल घडतोय हे कर्नाटकच्या रुपाने आपण पाहिलं. कर्नाटकच्या मतदानाला पंधरा दिवस राहिलेले असताना नरेंद्र मोदींनी आपली जादू चालवण्याचा प्रयत्न केला. बंगळुरु शहरात कित्येक किमीचा रोड शो, अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. मात्र त्यांची जादू काही चालली नाही. वातावरण बदलू लागलं आहे, परिवर्तानाची लाट स्पष्ट दिसते आहे. आता नरेंद्र मोदी हे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. पुढच्या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय करायचं? लोकसभेच्या वेळी काय करायचं? या चिंतेत आहेत.” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळात बदल गोंधळलेल्या अवस्थेतूनच
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंधळलेल्या अवस्थेतूनच केंद्रातल्या मंत्रिमंडळात बदल केला. काही जणांचे अधिकार काढून घेतले. दोन हजारांच्या नोटा वितरणातून बंद केल्या. मुळात या नोटा आणल्याच कशाला होत्या? दोन हजारांची नोट काही कुणी भाजीपाला खरेदीसाठी वापरत नाही. दोन हजारांच्या नोटा या फक्त काळा पैसा साठवण्यासाठी वापरल्या जात होत्या हे सगळ्यांना ठाऊक आहे. नोटबंदीमध्ये देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. त्यानंतर कोव्हिड आला, अजूनही अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे देशासमोर महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.” असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
धर्मांधतेच्या आधारावर भाजपाचे लोक आता काय काय करतील हे माहित नाही. एक निश्चित आहे की नवीन कार्यकर्ते भाजपा सोडून आपल्याकडे येत आहेत. लोकांना आता भाजपा ही दिशाहीन पार्टी झाल्याचं समजलं आहे. देशाचे प्रश्न सुटणार नाहीत याची खात्री लोकांना पटली आहे. आपण कर्नाटकमध्ये दणदणीत विजय मिळवला. तिथे ऑपरेशन कमळ वगैरे काही चालणार नाही. भाजपाचं दक्षिणेचं दार बंद झालं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या निवडणुकाही आपल्याला जिंकायच्या आहेत. असंही आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
२०२४ मध्ये आपण जर नरेंद्र मोदींना घालवलं नाही तर देशात लोकशाही राहणार नाही. देशात हुकुमशाहीची वाटचाल आपण रोज पाहतो आहोत त्यामुळे हे बदलायचं असेल तर २०२४ मध्ये जिंकावंच लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी फक्त मोठे पुतळे उभारले, मोठी भवनं उभारली मात्र देशातला तरुण बेरोजगार आहे. कर्ज काढून आणि कर लावून देश चालवता येत नाही असाही टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना लगावला आहे.