अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे आता लवकरच राजीनामा देतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. तसंच शिंदे गट अजित पवारांमुळे नाराज आहे अशीही चर्चा आहे. या सगळ्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं.

शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं आहे?

“लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही सगळे एकत्र लढवणार आहोत. मुख्यमंत्री नाराज नाही, त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. २०० पेक्षा जास्त आमदारांचं बहुमत आमच्याकडे आहे. सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आहे. ज्यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार राहिले आहेत ते लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची खोटी अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.” असं शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.

Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रात्री उशिरा आमदार आणि खासदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आणि खासदारांसह आणि मंत्र्यांसह आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली आहे असंही स्पष्ट करण्यात आलं. तसंच शिंदे गट नाराज आहे या फक्त अफवा आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेवायची गरज नाही असं मंत्री उदय सामंत यांनीही स्पष्ट केलं आहे.

शिंदे गट मुळीच नाराज नाही, याविषयी बैठकीत चर्चाही नाही

शिंदे गटात अजित पवारांमुळे नाराजी पसरली आहे का? असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले, “ही बातमी तुम्हाला कुठून समजली ते माहित नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे आमदार किंवा खासदार नाराज नाहीत. आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झालेल्या आहेत. मी ठामपणाने सांगू शकतो की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती झाल्याने किंवा ते महायुतीमुळे आल्याने शिंदे गटात नाराजी आहे अशी काहीही चर्चाही झालेली नाही. कुणीही नाराज नाही” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.